नंदुरबार, नवापूरात काँग्रेस तर, तळोद्यात भाजप विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 11:55 IST2017-12-18T11:54:19+5:302017-12-18T11:55:16+5:30

In Nandurbar, Navapur, BJP won in Talodan | नंदुरबार, नवापूरात काँग्रेस तर, तळोद्यात भाजप विजयी

नंदुरबार, नवापूरात काँग्रेस तर, तळोद्यात भाजप विजयी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून असलेल्या नंदुरबारातील नंदुरबार, नवापूर व तळोदा नगरपालिकेचे निकाल सोमवारी जाहीर झाल़े यात, नंदुरबारला कॉंग्रेसच्या रत्ना रघुवंशी, नवापूरात काँग्रेसच्या हेमलता पाटील तर तळोद्यात भाजपचे अजय परदेशी विजयी झाले आहेत़ 
जिल्ह्यातील तिनही पालिकांच्या निवडणूका अत्यंत चुरशीच्या झाल्या होत्या़ विशेष म्हणजे प्रचारासाठी भाजप आणि काँग्रेसतर्फे आजी-माजी मुख्यमंत्र्याच्या सभा झाल्याने चुरस वाढली होती़ त्यामुळे सोमवारी जाहीर होणा:या निकालाकडे सर्वाचे लक्ष होत़े सकाळी 10 ला मतमोजनीला सुरुवात झाली़ दीड तासात जवळपास सर्वच निकालाचे चित्र स्पष्ट झाल़े 
नंदुरबारात चुरशीची लढत झाली़ याठिकाणी काँग्रेसने आपली सत्ता कायम ठेवली आह़े नगराध्यक्षपदासाठी रत्ना चंद्रकांत रघुवंशी या 4 हजार 700 पेक्षा अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत़ तर, नवापूरात काँग्रेसच्या हेमलता पाटील या 1 हजार 706 मतांनी विजयी झाल्या आहेत़ तळोद्यात मात्र काँग्रेसला सत्ता कायम ठेवता आली नाही़ या ठिकाणी भाजपचे अजय परदेशी हे  1 हजार 390 मतांनी विजयी झाले आह़े 
नगरसेवक पदासाठीही काँग्रेसने नंदुरबारात एकूण 39 पैकी 29 जागा राखल्या आहेत़ त्यामुळे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आह़े नवापूरातदेखील काँग्रेसने 20 पैकी 14 जागा राखून स्पष्ट बहुमत मिळवले आह़े तळोद्यातही भाजपने एकूण 18 पैकी 11 जागा जिंकून येथेही भाजपने बहुमत मिळवले आह़े 

Web Title: In Nandurbar, Navapur, BJP won in Talodan