नंदुरबार पालिका पोटनिवडणुकीत भाजपाचे आकाश चौधरी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 11:52 IST2018-07-03T11:51:50+5:302018-07-03T11:52:01+5:30

Nandurbar Municipality Bypass in the byelection of BJP's Akash Chaudhary | नंदुरबार पालिका पोटनिवडणुकीत भाजपाचे आकाश चौधरी बिनविरोध

नंदुरबार पालिका पोटनिवडणुकीत भाजपाचे आकाश चौधरी बिनविरोध

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पालिका प्रभाग 16 अ च्या पोटनिवडणूकीत मुदतीअंती काँग्रेससह दोघा अपक्षांनी माघार घेतल्याने भाजपाचे आकाश प्रविण चौधरी यांची बिनविरोध निवड झाली़  निवडीनंतर भाजपाच्या कार्यकत्र्यानी एकच जल्लोष केला़ 
प्रभाग 16 मधील अ व ब जागेवर भाजपतर्फे प्रवीण चौधरी व त्यांच्या प}ी रेखा चौधरी पालिकेच्या सार्वत्रिक  निवडणुकीत विजयी झाले होत़े निवडणुकीनंतर अवघ्या तीनच महिन्यात नगरसेवक प्रवीण चौधरी यांचे निधन झाल़े  त्यामुळे त्यांचे पद रिक्त होऊन प्रभाग 16 अ मध्ये पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता़ कार्यक्रमांतर्गत भाजपचे अधिकृत उमेदवार आकाश प्रवीण चौधरी, काँग्रेसच्या उमेदवार विद्या संजय चौधरी, अपक्ष उमेदवार मोहन छोटालाल श्रॉफ व मेघश्याम मोहन श्रॉफ यांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होत़े सोमवारी अर्ज माघारीच्या अंतीम मुदतीत काँग्रेसच्या उमेदवार विद्या चौधरी तसेच अपक्ष उमेदवार मोहन श्रॉफ अणि मेघश्याम श्रॉफ या तिघांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाचे आकाश चौधरी यांची नगरसेवक पदावर बिनविरोध निवड करण्यात आली़ 
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वान्मती सी., सहायक अधिकारी गणेश गिरी, गोपाळ पाटील यांनी पोटनिवडणूक कार्यक्रमाचे कामकाज हाताळल़े बिनविरोध निवडप्रसंगी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत़े प्रभाग 16 मधून अ जागेवर प्रविण चौधरी तर ब जागेमधून त्यांच्या पत्नी रेखा चौधरी ह्या भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या़ निवडणूकीनंतर तीन महिन्यातच प्रविण चौधरी यांचे दुर्देवी निधन झाल़े त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक लागली होती़ भाजपाने प्रविण चौधरी यांच्या घरातील उमेदवार दिल्यास काँग्रेसतर्फे उमेदवार दिला जाणार नाही असे सुतोवाच आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी यापूर्वीच केले होत़े त्यानुसार त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराची माघार घेतली़ 

Web Title: Nandurbar Municipality Bypass in the byelection of BJP's Akash Chaudhary