शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

नंदुरबारात महिनाभर आधीच मिरची आवक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 15:52 IST

नंदुरबार बाजार समिती : सुरुवातीलाच भाव 1400 ते 2100 रुपयांर्पयत

नंदुरबार : यंदा महिनाभर आधीपासून लाल मिरचीची आवक सुरू झाली आहे. भाव देखील 1400 ते 2100 रुपयांर्पयत मिळत असल्यामुळे शेतक:यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. हिरव्या मिरचीला अगदीच कमी भाव मिळत असल्यामुळे आता मिरची लाल झाल्यावर ती थेट बाजारात विक्रीसाठी आणली जावू लागली आहे. सध्या आवक कमी असली तरी येत्या काळात ती वाढण्याची शक्यता आहे.नंदुरबारच्या बाजारात साधारणत: ऑक्टोबरच्या दुस:या किंवा तिस:या आठवडय़ापासून लाल मिरचीची आवक सुरू होत असते. खान्देशात मिरचीचे सर्वात मोठे मार्केट म्हणून नंदुरबारच्या मार्केटकडे पाहिले जाते. येथील बाजारभावावरूनच इतर मार्केटमधील बाजार भावावर देखील परिणाम होत असतात. यंदा मिरचीची लागवड गेल्या वर्षाच्या तुलनेत असली तरी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे उत्पादकता कमी होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली. परंतु वेळेआधीच लाल मिरची बाजारात आल्याने पथारीवर लाल गालिचा पसरण्यास सुरुरवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून साधारणत: 200 ते 400 क्विंटल आवक होत आहे. येत्या काळात ती आणखी वाढण्याची शक्यताही बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी वर्तविली.हिरवी मिरचीला भाव कमीसध्या बाजारात हिरवी मिरचीची ढेसर झाली आहे, परिणामी भाव अवघा 700 ते 800 रुपये क्विंटल असा मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून बाजार समितीच्या आवारातच हिरवी मिरचीची पथारी देखील पहावयास मिळत आहे. हिरवी मिरचीला एवढा कमी भाव मिळत असल्यामुळे शेतक:यांनी आता ती लाल करूनच बाजारात आणण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी देखील हिरवी मिरची साधारणत: सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासूनच दाखल झाली होती. यंदासारखीच आवकची परिस्थिती होती. परिणामी बाजार समितीच्या आवारात ठिकठिकाणी हिरवी मिरची वाळविण्यासाठी पथारीसारखी टाकली जात होती. लाल झाल्यावर विक्री हिरव्या मिरचीला भाव कमी असल्यामुळे शेतकरी थोडा त्रास सहन करून मिरची लाल झाल्यावरच ती बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. गेल्या तीन दिवसात दररोज सरासरी 300 ते 400 क्विंटल आवक होत  आहे. बाजार समितीत दररोज तीन ते चार वाहने येऊ लागली आहेत. सध्या येणारी मिरचीची प्रतवारी देखील चांगल्या प्रकारची असल्याचे व्यापा:यांचे म्हणने आहे. आवक होणा:या मिरचीमध्ये व्हीएनआर आणि लाली या जातीच्या मिरचीचा समावेश आहे. लवकरच फाफडा, व्हिनेगार, शंकेश्वरी या मिरचीची आवक होण्याची शक्यता आहे. साधारणत: दस:यानंतर येथील मिरची बाजारात सरासरीच्या तुलनेत आवक सुरू होण्याची शक्यता      आहे.पाऊस नसल्याने खरेदीसध्या पाऊस नसल्याने लाल मिरची खरेदी करण्यास व्यापारीही उत्सूक आहेत. लाल मिरची खरेदी केल्यास ती सुकविण्यासाठी पथारींवर टाकावी लागते. सध्या पावसाळा सुरू असला तरी पावसाचे कुठलेही चिन्हे नाहीत. त्यामुळे खरेदी केलेली मिरची सुकवून घेण्यासाठी पुरेसा     कालावधी मिळणार असल्यामुळे मिरची खरेदीला ब:यापैकी प्रतिसाद आहे. पाऊस आल्यास मिरची पथारीवरील मिरची सांभाळण्याची मोठी कसरत होत असते. त्यामुळे जास्तीत जास्त व्यापारी ऑक्टोबरनंतरच मिरची खरेदीला पसंती देत असतात.