गाडी लावण्याच्या वादातून नंदुरबारात मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 12:33 IST2018-03-04T12:33:59+5:302018-03-04T12:33:59+5:30

एकजण जखमी : परस्परविरोधी गुन्हे दाखल

Nandurbar hit by a vehicle dispute | गाडी लावण्याच्या वादातून नंदुरबारात मारहाण

गाडी लावण्याच्या वादातून नंदुरबारात मारहाण

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 4 : रस्त्यावर वाहने लावण्याच्या कारणावरून नंदुरबारात दोन गटात हाणामारी झाली. यात एकजण गंभीर जखमी झाला असून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. 
शहरातील हिरो शोरूमच्या पाठीमागील भागात राहणारे नरेंद्र बाबुराव शिंदे व कल्पेश गौतमचंद जैन यांच्यात हा वाद झाला. कॉलनीतील लोकं रस्त्यावर कशाही पद्धतीने          वाहने उभी करीत असल्यामुळे आपल्या मुलाला घेण्यासाठी येणारी स्कूलबस कॉलनीत येवू शकत नाही. त्यामुळे मुलाला लांब सोडण्यासाठी जावे लागते. कॉलनीतल्या लोकांनी वाहने शिस्तीने लावावी असे सांगण्यास गेलेल्या नरेंद्र शिंदे यांना त्यांच्याच कॉलनीतील कल्पेश गौतमचंद जैन, धिरज गौतमचंद जैन, महावीर गुलाबचंद जैन, अमित मुकेश गोशल्या यांनी हाताबुक्यांनी व लोखंडी फाईटरने जबर मारहाण  केली. शिवाय त्यांच्या खिशातील           18 हजार रुपये तीन तोळे सोन्याची चेन जबरीने काढून घेतल्याची           फिर्याद शिंदे यांनी दिली आहे. त्यावरून जैन बंधू व गोशल्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
दुसरी फिर्याद गौतम पारसमल जैन यांनी दिली. अंगणात गाडी लावण्याच्या वादातून राजेंद्र बाबुलाल शिंदे व नरेंद्र बाबुलाल शिंदे यांनी बेदम मारहाण केली. तसेच खिशातील 20 हजार रुपये रोख व 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरीने चोरून  घेतल्याचे फिर्यादीत जैन यांनी नमुद केले आहे. त्यावरून शिंदे बंधूविरूद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक सुनील बच्छाव करीत आहे.
दरम्यान, किरकोळ कारणावरून झालेल्या या हाणामारीमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.
 

Web Title: Nandurbar hit by a vehicle dispute