शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

नंदुरबार-दोंडाईचा : दुहेरीकरणाची अंतिम चाचणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:46 PM

अनेक गाडय़ा रद्द, लांब पल्ल्याच्या गाडय़ा वळविल्याने प्रवाशांचे हाल

नंदुरबार : उधना-जळगाव रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाअंतर्गत नंदुरबार ते दोंडाईचा या दुस:या लाईनची अंतिम चाचणी घेण्याचे काम शुक्रवार, 20 जुलैपासून सुरू करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने यासाठी 20 व 21 हे दोन दिवस मेगा ब्लॉक घेतले आहेत. यामुळे या मार्गावरील अनेक गाडय़ा रद्द करण्यात आल्या असून लांब पल्ल्याच्या गाडय़ांना इतर मार्गानी वळविण्यात आले आहे. परिणामी या मार्गावरील प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणावर हाल होत आहेत. दरम्यान, नंदुरबार ते सुरत एस.टी.बस आणि खाजगी वाहतुकीला मोठा प्रतिसाद मिळत आहे.  उधना ते जळगाव या 306 किलोमिटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. शेवटच्या टप्प्यातील नंदुरबार ते दोंडाईचा या 30 किलोमिटर मार्गाचे काम देखील पुर्ण झाले असून रेल्वेच्या वरिष्ठ अधिका:यांच्या उपस्थितीत मे महिन्यात चाचणी देखील घेण्यात आली होती. आता सिग्नल, विद्युतीकरण आणि इतर तांत्रिक कामांची चाचणी घेण्यात येत आहे. त्यासाठी शुक्रवार व शनिवारी मेगा ब्लॉक घेण्यात येवून अंतिम चाचणी घेण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी या मार्गावरील सर्वच प्रवासी व मालवाहू गाडय़ा प्रभावीत झाल्या आहेत.चाचणीला सुरुवातनंदुरबार ते दोंडाईचा या मार्गावरील अंतिम चाचणीला शुक्रवारी सकाळपासून सुरुवात करण्यात आली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतांनाही सर्व तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात आले. विद्युतीकरण पुर्ण झालेले आहे. परंतु ट्रॅक आणि विद्युतीकरण यांची चाचणी घेण्यासाठी या मार्गावर 120 किलोमिटर प्रतीतास या वेगाने रेल्वे चालविण्यात आली. ती चाचणी देखील यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. यासाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. शनिवारी देखील दिवसभर ही चाचणी घेतली जाणार आहे. रविवारी हा मार्ग सामान्य प्रवासासाठी खुला होणार आहे.औपचारिक उद्घाटननवीन अर्थात दुस:या रेल्वे मार्गाचे उद्घाटन लवकरच रेल्वेमंत्री किंवा राज्यमंत्री यांच्या हस्ते करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. शक्य झाल्यास पंतप्रधानांना देखील बोलविण्याची तयारी असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात उद्घाटन उधना येथे की जळगाव येथे होते याकडे लक्ष लागून आहे. मिळालेल्या महितीनुसार दोंडाईचा किंवा नंदुरबार येथे देखील हा कार्यक्रम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दोन पॅसेंजर रद्दसुरत-भुसावळ (59013) व भुसावळ-सुरत पॅसेंजर (59014) ही खान्देशातील प्रवाशांसाठी अतिशय जिव्हाळ्याची रेल्वे पॅसेंजर दोन्ही दिवस रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणावर हाल झाले. सुरत-नंदुरबार पॅसेंजरला उकई-सोनगडर्पयत सोडण्यात आले तर नंदुरबार-सुरत पॅसेंजर देखील उकई-सोनगडर्पयतच सोडण्यात आली होती. सुरत-भुसावळ पॅसेंजरला (59013, 12844, 18402, 18406, 16506) बारडोली, व्यारा, दोंडाईचा व अमळनेर येथे अतिरिक्त वेळेत थांबा देण्यात आला आहे.प्रवाशांचे हालअनेक प्रवासी रेल्वेगाडय़ा वळविण्यात आल्याने किंवा रद्द झाल्याने या मार्गावरील प्रवाशांची मोठय़ा प्रमाणावर हाल झाली. काही प्रवाशांना याबाबत माहिती नसल्यामुळे रेल्वे स्थानकावर येवून त्यांना परत फिरावे लागत होते. त्यामुळे बसस्थानक आणि खाजगी ट्रॅव्हल्सच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. सुरतकडे जाणा:या सर्वच एस.टी.बसेस आणि खाजगी वाहने प्रवाशांनी भरून जात होते. शनिवारी देखील हीच स्थिती राहणार असल्यामुळे एस.टी.प्रशासनाने प्रवासी संख्या पाहून अतिरिक्त बसेस सोडण्याबाबत निर्णय घेणार आहे.