शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

2024 र्पयत नंदुरबार जिल्हा होणार ‘हत्तीरोग’ मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:27 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आरोग्य विभागाने 2004 पासून जिल्ह्यात राबवलेल्या सव्रेक्षण मोहिमांतर्गत हत्तीरोग रुग्णांना उपचार मिळत गेल्याने 2024 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आरोग्य विभागाने 2004 पासून जिल्ह्यात राबवलेल्या सव्रेक्षण मोहिमांतर्गत हत्तीरोग रुग्णांना उपचार मिळत गेल्याने 2024 र्पयत नंदुरबार जिल्हा हत्तीरोग मुक्त होण्याच्या मार्गावर आह़े जिल्ह्यात नव्याने एकही रुग्ण आढळून आलेला नसल्याने जिल्ह्याची दावेदारी प्रबळ होत आह़े तूर्तास जिल्ह्यात हत्तीरोगाचे केवळ 27 रुग्ण असून सर्वाधिक रुग्ण हे नवापुर तालुक्यात आहेत़       राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 2004 पासून हत्तीरोग निमरुलन कार्यक्रम राबवण्यात येत आह़े कधीकाळी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये निर्माण होणा:या क्यूलेस क्विंकीफेसिएट्स या डासांची पैदास झाल्याने हत्तीरोगाचा प्रसार झाला होता़ हत्तीरोगाचे जंतू शरीरात प्रवेशित झाल्याने विविध लक्षणे दिसून येत पायाला सूज येऊन अनेकांना आजाराची लागण झाली होती़ यातील काहींना कायमस्वरुपी अपंगत्त्व आणि विकृती आल्याने त्यांचे आयुष्य उध्वस्त झाले आह़े यातून मार्ग काढत जिल्हा आरोग्य विभागाने हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली होती़ यांतर्गत तळोदा आणि नवापुर येथे रात्र प्रयोगशाळा उभारुन रक्तनमुन्यांची नियमित तपासणी केली गेली आह़े जिल्ह्यात शासनाने दिलेल्या आदेशानुसार 2017 मध्ये सव्रेक्षण करण्यात आले होत़े या सव्रेक्षणाअंती रुग्णांना देण्यात येणा:या गोळ्या बंद करण्यात आल्या होत्या़ यातून घेतलेल्या रक्तनमुन्यात एकही रक्तनमुना पॉङिाटिव्ह आढळलेला नसल्याने जिल्ह्यात हत्तीरोगाचा रुग्ण आढळला नव्हता़ यामुळे या सव्रेक्षणात जिल्हा ‘पास’ झाला होता़ हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर यंदाच्या वर्षात पुन्हा नव्याने सव्रेक्षण राबवण्यात येत असून यांतर्गत नवापुर तालुक्यातील आठ गावांमध्ये सहा वर्षाआतील लहान बालकांचे रक्तनमुने घेऊन तपासणी करण्यात येत आह़े जिल्ह्यात मार्च 2020 मध्ये रॅपिड सव्रेक्षण करुन त्यापुढील सव्रेक्षणानंतर जिल्हा हत्तीरोग मुक्त घोषित होणार आह़े नवापुर तालुक्यातील जुनी सावरट येथे हत्तीरोगाच्या तपासणीसाठी पाच ते नऊ वर्षे वयोगटातील 50 बालकांचे रक्त नमुने बुधवारी रात्री संकलीत करण्यात आले. दरवर्षी हिवाळ्यात तालुक्यात अशी तपासणी मोहिम राबविण्यात येत़े तालुक्यातील विशेषत: पश्चिम भागातील गावांमधे हत्तीपाय आजाराचे रुग्ण आढळुन येतात. इतरही भागात या रोगाचा काही अंशी प्रादुर्भाव वेळोवेळी दिसुन आल्याने प्रशासनाकडुन पुरेशी काळजी घेतली जाते. जिल्हा हिंवताप अधिकारी डॉ. ढोले यांनी पथक पाठवुन प्राथमिक आरोग्य केंद्र वावडी अंतर्गत जुनी सावरट येथील बालकांचे रक्ताचे नमुने गोळा केले. पोस्ट एम डी ए कार्यक्रम अंतर्गत ही मोहिम राबविण्यात आली. तालुका पर्यवेक्षक बी. बी. वसावे यांनी मोहिमेची माहिती देत समुपदेशन केल़े बी. बी. वसावे, अनिल जाधव, ए. जी. जाधव, व्ही. डी. पाडवी, आशाबाई वळवी, गिताबाई वळवी व सुरेखाबाई वसावे यांनी बालकांचे रक्तनमुने घेतल़े  

जिल्ह्यात आजअखेरीस 27 हत्तीरोग झालेले रुग्ण आढळून आले आहेत़ यात नंदुरबार 3, शहादा 2, नवापुर 13, तळोदा 5 तर धडगाव तालुक्यात चार रुग्ण आढळून आले आहेत़ सर्वाधिक रुग्ण नवापुर तर अक्कलकुवा तालुक्यात गेल्या वर्षभरात एकही रुग्ण आढळून आलेला नसल्याची माहिती सव्रेक्षण अहवालातून समोर आली आह़े सुतासारख्या दिसणा:या कृमीमुळे होणा:या या आजारावर नियमित गोळ्या वाटप करुन जिल्ह्यात उपचार करण्यात येत असल्याची माहिती हिवताप विभागाकडून देण्यात आली आह़े 

हत्तीरोगानंतर अंडवृद्धीचे तब्बल 11 रुग्ण जिल्ह्यात आहेत़ यात सर्वाधिक आठ रुग्ण हे नवापुरात तर तळोदा तालुक्यात 3 रुग्ण आहेत़ विकृती आल्याने यातील काहींना आयुष्यभराचे अपंगत्त्व आल्याची माहिती देण्यात आली आह़े तळोदा आणि नवापुर तालुक्यात रुग्ण आढळून येण्याची शक्यता सर्वाधिक असल्याने याठिकाणी रात्र तपासणी होत आह़े यांतर्गत जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत तळोदा येथील दवाखान्यात 14 हजार 101 तर नवापुर तालुक्यातून 13 हजार 60 जणांच्या रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली आह़े