शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : नंदुरबार जिल्ह्यात मतदान जागृतीसाठी पथनाटय़ासह विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यात मतदान जागृती आणि दिव्यांग मतदारांना देण्यात येणा:या सुविधांची माहिती जनतेपयर्ंत पोहोचविण्यासाठी स्वीप अंतर्गत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यात मतदान जागृती आणि दिव्यांग मतदारांना देण्यात येणा:या सुविधांची माहिती जनतेपयर्ंत पोहोचविण्यासाठी स्वीप अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयांसह सामाजिक संस्थांनीदेखील यात सहभाग घेतला आहे.जिल्हा परिषद आणि आश्रमशाळेच्या विद्याथ्र्यांनी मतदार जनजागृती रॅलीद्वारे मतदानाचे आवाहन केले. शाळांमधून चित्रकला आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करून मतदानाचा संदेश देण्यात आला. शाळकरी विद्याथ्र्यांनी सुंदर कलेच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.विद्याथ्र्यांनी अनेक ठिकाणी अभिनव कल्पनेतून मतदानाचे संदेश साकारले. धडगाव-अक्राणी सारख्या दुर्गम भागातदेखील या उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दिव्यांग मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यासाठीदेखील रॅलीचे आयोजन करण्यात आले. शाळेतील शिक्षकदेखील उपक्रमात उत्स्फुर्तपणे सहभागी होत असल्याने हा उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक भागात पोहोचला आहे.युवारंग फाऊंडेशन कलापथकाद्वारे पथनाटय़ाच्या माध्यमातून मतदानाचा संदेश देण्यात येत आहे. या पथकाद्वारे मतदासाठी प्रशासनाने केलेल्या सुविधांची माहिती देण्याबरोबर कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.जिल्ह्यातील चारही मतदारसंघात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिकांचे सार्वजनिक ठिकाणी आणि तहसील कार्यालयात प्रात्यक्षिक आयोजित करून नागरिकांना ईव्हीएम यंत्राबाबत माहिती करून देण्यात येत आहे. मतदान प्रक्रीया समजून घेण्यासाठी ही प्रात्यक्षिके उपयुक्त ठरत आहेत.नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी मतदान जागृती उपक्रमात सहभाग घ्यावा आणि जिल्ह्याला मतदानाच्या टक्केवारीत प्रथम आणण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.