नंदुरबारात महाप्रसादासाठी भाविकांची उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 12:15 IST2018-02-15T12:15:00+5:302018-02-15T12:15:37+5:30

In Nandurbar, the crowd of devotees for Mahaprashad | नंदुरबारात महाप्रसादासाठी भाविकांची उसळली गर्दी

नंदुरबारात महाप्रसादासाठी भाविकांची उसळली गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार शहरातील दंडपानेश्वर मंदिर, कल्याणेश्वर महादेव मंदिर, डुबकेश्वर महादेव मंदिर यासह अनेक शिवालयांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होत़े याचा मोठय़ा संख्येने भाविकांनी सहभाग घेतला़
महाशिवरात्रीनिमित्त दुस:या दिवशीही भाविकांकडून शिवालयांमध्ये गर्दी करण्यात आली होती़ अनेक स्वयंसेवी संस्थांकडून महाप्रसादासाठी लागणा:या साहित्ये, धान्य, किराणा आदींचे दान देण्यात आले होत़े दंडपानेश्वर मंदिरात महाप्रसादासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती़ दुपार्पयत ही गर्दी कायम असल्याचे चित्र दिसून आले होत़े ग्रामीण भागातूनही भाविकांनी हजेरी लावली होती़ गुरुवारी महाप्रसाद असल्याने मंदिर प्रशासनाकडून बुधवारी रात्रीच मंडपाची उभारणी करण्यात आली होती़ भाविकांची उसळणारी गर्दी बघता गर्दी हाताळण्यासाठी स्वयंसेवकही तैनात करण्यात आले होत़े अनेक ठिकाणी महाप्रसादात मसाले भात देण्यात आला होता़ 

Web Title: In Nandurbar, the crowd of devotees for Mahaprashad