शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार : डमी अर्ज वगळता इतर सर्व अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार मतदारसंघात डॉ.सुप्रिया गावीत यांचा डमी अर्ज बाद झाला. इतर सर्व अर्ज वैध ठरले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार मतदारसंघात डॉ.सुप्रिया गावीत यांचा डमी अर्ज बाद झाला. इतर सर्व अर्ज वैध ठरले. काँग्रेस व भाजपच्या दोन्ही प्रमुख उमेदवारांविरूद्धच्या हरकती फेटाळण्यात आल्या.नंदुरबार मतदारसंघात छाननी अंती डॉ.विजयकुमार गावीत (भाजप), उदेसिंग पाडवी (काँग्रेस), आनंदा सुकलाल कोळी (अपक्ष), विश्वनाथ वळवी (अपक्ष), कुणाल वसावे (अपक्ष), दिपा वळवी (वंचीत आघाडी), विपूल रामसिंग वसावे (बसपा), अॅड.प्रकाश गांगुर्डे (स्वाभिमानी) यांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. दरम्यान, डॉ.विजयकुमार गावीत व उदेसिंग पाडवी यांच्या अर्जावरील हरकती निकाली काढण्यात आल्या. आता आठ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्वाती थवील होत्या.    

ंअक्कलुकवा : पाच जणांचे अर्ज बादनंदुरबार : अक्कलकुवा मतदारसंघात पाच अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता 14 उमेदवार रिंगणात आहेत.मतदारसंघात 19 जणांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीत पाच जणांचे अर्ज विविध कारणांनी बाद ठरविण्यात आले. बाद ठरलेल्या अर्जामध्ये नागेश दिलवरसिंग पाडवी यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला होता. परंतु ए.बी.फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. शंकर आमशा पाडवी यांनी शिवसेनेतर्फे अर्ज भरला होता. परंतु डमी असल्यामुळे बाद ठरला. याशिवाय रोता पाल्या तडवी (वंचीत बहुजन आघाडी), बिजेसिंग करमसिंग पावरा (अपक्ष), हेमलता कागडा पाडवी यांचा डमी अर्ज विविध कारणांनी बाद ठरविण्यात आला. आता येथे आमशा पाडवी (शिवसेना), अॅड.के.सी.पाडवी (काँग्रेस), नागेश पाडवी (अपक्ष), कैलास वसावे (आप) यांच्यासह एकुण 14 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुल पाटील होते. 

नवापूर : चार जणांचे अर्ज बादनंदुरबार : नवापूर मतदारसंघात एकुण 16 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पैकी चार अर्ज बाद झाल्याने आता 12 उमेदवार रिंगणात आहेत.अर्ज बाद झालेल्या उमेदवारांमध्ये रजनी नाईक यांनी काँग्रेसचा डमी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. याशिवाय अपक्ष उमेदवार माधवराव काशिराम पाडवी, प्रदीपकुमार गावीत, रामा तिज्या गावीत यांचे अर्ज विविध कारणांनी बाद ठरविण्यात आले. आता रिंगणात भरत गावीत (भाजप), शिरिषकुमार नाईक (काँग्रेस), जगन गावीत (वंचीत आघाडी), सुनील गावीत (आप), रामू वळवी (पिपल्स पार्टी) यांच्यासह एकुण 12 उमेदवार रिंगणात आहेत. येथे कुणीही हरकत न घेतल्याने छाननीची प्रक्रिया लागलीच झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेश शेलार होते. 

शहादा : एक अर्ज बादशहादा : शहादा-तळोदा विधानसभा मतदार संघात एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरविण्यात आला. सहा उमेदवार आता रिंगणात आहेत. उमेदवारीबाबत कोणीही हरकत घेतली नसल्याने शांततेत उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली.परिपुर्ण अर्ज भरला नसल्यामुळे अपक्ष उमेदवार सिमा वळवी यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला.  छाननी अंती अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये पद्माकर वळवी (काँग्रेस), राजेश पाडवी (भाजप), जयसिंग माळी (भाकप), ङोलसिंग पावरा (अपक्ष), सचिन कोळी (अपक्ष), मोहनसिंग शेवाळे (अपक्ष) हे उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ.चेतन गिरासे होते.