चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST2021-03-29T04:18:20+5:302021-03-29T04:18:20+5:30
नंदुरबार : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना रोषमाळचा शिवणीपाडा, ता.धडगाव येथे २६ मार्च रोजी घडली. याप्रकरणी ...

चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा खून
नंदुरबार : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना रोषमाळचा शिवणीपाडा, ता.धडगाव येथे २६ मार्च रोजी घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यास अटक करण्यात आली आहे.
जमनाबाई तुंबड्या पावरा (३७) रा.रोषमाळचा शिवणीपाडा असे मयत महिलेचे नाव आहे तर तुंबड्या शिवा पावरा असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, शिवणीपाडा येथे राहणारा तुंबड्या शिवा पावरा हा नेहमीच जमनाबाई पावरा हीच्यावर चारित्र्याचा संशय घेत होता. त्यावरून तो नेहमीच तिला मारहाण करीत होता. २६ मार्च रोजी देखील त्याने जमनाबाई पावरा यांना काठीने व हाताबुक्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाला.
याबाबत उदयसिंग रोल्या पावरा यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून तुंबड्या पावरा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार दिलीप महाजन करीत आहे. संशयीत तुंबड्या पावरा यास अटक करण्यात आली आहे.