शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात पालिकेने साकारली आधुनिक महिला जीम, २६ रोजी उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:32 IST

नंदुरबार : पालिकेतर्फे महिलांसाठी खास जीम सुरू करण्यात येत असून त्याचा शुभारंभ २६ जानेवारी रोजी महिला लोकप्रतिनिधी व अधिकारी ...

नंदुरबार : पालिकेतर्फे महिलांसाठी खास जीम सुरू करण्यात येत असून त्याचा शुभारंभ २६ जानेवारी रोजी महिला लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या हस्ते होत आहे. या जीममध्ये केवळ महिलांनाच प्रवेश दिला जाणार असून प्रशिक्षणार्थी देखील महिलाच राहणार आहेत. जीमचे नामकरण विमलाई असे करण्यात आले आहे.

महिलांसाठी आधुनिक जीम करण्याचा संकल्प नंदुरबारच्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी केला होता. त्या अनुषंगाने पालिकेने सी.बी.पेट्रोल पंपासमोर स.नं.१८७-१ येथील खुल्या जागेत ही जीम साकारली गेली आहे. जीमचे उद्‌घाटन साक्रीच्या आमदार मंजुळा गावीत यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली २६ रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी वसुमना पंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी ठाकुर, सहायक आयुक्त तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, जिजामाता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शोभा मोरे, इंदिरा महिला सहकारी बँकेच्या चेअरमन कविता रघुवंशी, प्रभागाच्या नगरसेविका आशा बालाणी आदी उपस्थित राहणार आहेत.

जीम आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आली आहे. बंदिस्त व वातानुकूलित आहे. साहित्य, संगीत, योगाभ्यास याकरिता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व प्रशिक्षक या महिलाच राहणार आहेत.

कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष रवींद्र पवार, बांधकाम सभापती प्रमोद शेवाळे, पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, शिक्षण सभापती नंदा जाधव, महिला सभापती भावना गुरव, आरोग्य सभापती मेहरुन्नीसा मेमन, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी केले आहे.