मुगाची आवक 90 टक्क्यांनी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 12:04 IST2019-09-29T12:04:34+5:302019-09-29T12:04:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाला चांगला भाव मिळत असला तरी यंदा मुगाची आवक मागील ...

मुगाची आवक 90 टक्क्यांनी घटली
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाला चांगला भाव मिळत असला तरी यंदा मुगाची आवक मागील वर्षाच्या तुलनेत 90 टक्क्यांनी घटली आहे. नंदुरबार बाजार समितीत सद्यस्थितीत केवळ 45 क्विंटल मुग दाखल झाला आहे. या शेतमालास सातत्याने होणा:या पावसाचा फटका बसल्याचे म्हटले जात आहे.
उशिराने आगमन झालेला पाऊस व नंतर झालेली अतिवृष्टी शिवाय सतत सुरू असलेला पाऊस, यामुळे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत खरीप हंगामातील शेतमालाची आवक घटली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाला पाच हजार ते सहा हजार 100 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळत आहे. मागील वर्षी आजच्या तारखेर्पयत 500 क्विंटल मुगाची आवक झाली होती. त्या तुलनेत यंदा 90 टक्के आवक घटली आहे. दाखल होणा:या मालात पावसामुळे खराब झालेला मुगच अधिक आहे. त्यामुळे बाजार समितीने खरेदी केलेला मुग साठवून ठेवण्योग्य नसल्याचे दिसून येत आहे.