खासदार हिना गावीत लवकरच अडकणार विवाह बंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 13:13 IST2020-02-27T13:13:16+5:302020-02-27T13:13:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खासदार डॉ.हिना गावीत या लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. बुधवार, २६ रोजी मुळचे माता असली, ...

MP Hina Gavit will soon get married | खासदार हिना गावीत लवकरच अडकणार विवाह बंधनात

खासदार हिना गावीत लवकरच अडकणार विवाह बंधनात

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खासदार डॉ.हिना गावीत या लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. बुधवार, २६ रोजी मुळचे माता असली, ता.धडगाव येथील व सध्या मुंबई येथे जे.जे.हॉस्पीटलमध्ये कार्यरत डॉ.तुषार वळवी यांच्याशी त्यांचा साखरपुडा झाला.
नंदुरबारातील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या साखरपुडा कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. डॉ.हिना गावीत या एम.डी. झाल्या आहेत. डॉ.तुषार हे देखील एम.डी. आहेत. सध्या मुंबई येथेच ते वैद्यकीय सेवा करीत आहेत. डॉ.हिना यांचे वडिल आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आई जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्या कुमुदिनी गावीत, भगिनी डॉ.सुप्रिया गावीत यांनी अतिथींचे स्वागत केले.
खासदार डॉ.हिना गावीत यांनी २०१४ साली भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत डॉ.हिना गावीत यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला होता. दुसऱ्या टर्मला देखील त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्यांची केंद्राच्या विविध समित्यांवर निवड झाली आहे.
केंद्राच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत दहा पेक्षा अधीक देशांच्या दौºयात त्या सहभागी झाल्या आहेत. तीन वेळा त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.

Web Title: MP Hina Gavit will soon get married