प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:44 IST2019-08-14T12:44:45+5:302019-08-14T12:44:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य ग्रामसेवक युनियन (डीएनए 136) तर्फे राज्यभरात 9 ऑगस्टपासून असहकार आंदोलन सुरु करण्यात आले ...

Movement of village workers for pending demands | प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे आंदोलन

प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य ग्रामसेवक युनियन (डीएनए 136) तर्फे राज्यभरात 9 ऑगस्टपासून असहकार आंदोलन सुरु करण्यात आले आह़े मंगळवारी जिल्हा परिषदेच्या आवारात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. 
आंदोलनात जिल्ह्यातील विविध भागात कार्यरत ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामसेविका यांनी सहभाग नोंदवला़ प्रसंगी आंदोलकांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनयकुमार गौडा यांना मागण्यांचे निवेदन दिल़े मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात  येऊन  सेवाविषयक प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली़
आंदोलनात जिल्हाध्यक्ष रविंद्र वळवी, सचिव र}ाकर शेंडे, पी.जी सोनवणे, नंदुरबार तालुकाध्यक्ष रोहिदास पवार, नरेंद्र पाटील, संतोष शिंदे, नितीन पाटील, अतीश चव्हाण, वैशाली गिरासे, दिपाली उगलमुगले, दौलत कोकणी यांनी सहभाग घेतला़  
 

Web Title: Movement of village workers for pending demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.