तळोद्यातून भर दुपारी मोटारसायकलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST2021-07-14T04:35:53+5:302021-07-14T04:35:53+5:30

शहादा शहरातून मोटारसायकलची चोरी नंदुरबार : शहादा शहरातील प्रेस मारुती परिसरातील किराणा दुकानासमोरून अंबालाल दत्तू पाटील रा.काशिमानगर यांच्या मालकीची ...

Motorcycle theft in the afternoon from the bottom | तळोद्यातून भर दुपारी मोटारसायकलची चोरी

तळोद्यातून भर दुपारी मोटारसायकलची चोरी

शहादा शहरातून मोटारसायकलची चोरी

नंदुरबार : शहादा शहरातील प्रेस मारुती परिसरातील किराणा दुकानासमोरून अंबालाल दत्तू पाटील रा.काशिमानगर यांच्या मालकीची १२ हजार रुपयांची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. २१ जून रोजी ही चोरी झाली होती. या प्रकरणी अंबालाल पाटील यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अंकिता बाविस्कर करत आहेत.

रहदारीस अडथळा करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबार : अक्कलकुवा शहरातील बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर बस स्थानक परिसरात जीजे २६-टी ६०९१ व जीजे २६-टी-३०३० ही वाहने लावून वाहतूकीस अडथळा निर्माण करण्यात आल्याने पोलीसांकडून कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सागर मानसिंग वळवी रा. काकलपूर व नितेश दासू पाडवी रा.सेलवाई, ता.तळोदा यांच्याविरोधात पोलीस कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Motorcycle theft in the afternoon from the bottom