आजारी तान्हुल्याला पोटाशी कवटाळून मातेने केली 10 किलोमीटरची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 12:38 IST2019-08-21T12:37:56+5:302019-08-21T12:38:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : अतीवृष्टीमुळे मोलगी ते अक्कलकुवा रस्त्यावरच्या फरश्या वाहून गेल्याने वाहतूक बंद आह़े याचा फटका दुर्गम ...

The mother made a 10-kilometer footpath by rubbing the sick tanhula with her stomach | आजारी तान्हुल्याला पोटाशी कवटाळून मातेने केली 10 किलोमीटरची पायपीट

आजारी तान्हुल्याला पोटाशी कवटाळून मातेने केली 10 किलोमीटरची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : अतीवृष्टीमुळे मोलगी ते अक्कलकुवा रस्त्यावरच्या फरश्या वाहून गेल्याने वाहतूक बंद आह़े याचा फटका दुर्गम भागातील नागरिकांना बसत असून मंगळवारी मालीआंबा ता़ अक्कलकुवा येथील माता आजारी तान्हुल्याला कवेत घेऊन पावसातच अक्कलकुव्याकडे पायी जात असल्याचे विदारक दृश्य दिसून आल़े 
7 ते 9 ऑगस्टदरम्यान झालेल्या अतीवृष्टीमुळे मोलगी ते अक्कलकुवा मार्गावर तब्बल आठ पूल कोसळले आहेत़ यामुळे मोलगीकडून येणारे आदिवासी देवगोई ते देवगुल्लर असा वाहनाने प्रवास करुन पुढे 10 किलोमीटर आमलीबारीर्पयत पायी प्रवास करत आहेत़ मंगळवारी सकाळी देवगुल्लर ते आमलीबारी दरम्यान रिमङिाम पाऊस सुरु असताना खांद्यावर छत्री अडकवून दोन्ही हातात बाळाला घेत अक्कलकुव्याकडे जाणारी माता पायी चालणा:या इतर सहप्रवाशांना दिसून येत होती़ मोलगी येथे उपचार न झाल्याने अक्कलकुवा येथील रुग्णालयात जाणे गरजेचे असल्याने माता एकटय़ानेच पायी प्रवास करत निघाली होती़ 10 किलोमीटर पायपीट करणा:या  मातेला आमलीबारी येथून सोबतच्या प्रवाशांनी अक्कलकुव्याकडे रवाना केल्याची माहिती आह़े महिलेचे नाव किंवा बाळाची प्रकृती याबाबत माहिती मिळू शकलेली नाही़  दुर्गम भागात उपचार भेटत नसल्याने अनेकांना पायी प्रवास करत अक्कलकुवा जावे लागत आह़े सातपुडय़ातील या भीषण स्थितीमुळे प्रशासनाने गांभिर्याने कामाला सुरुवात करावी अशी मागणी आह़े 

Web Title: The mother made a 10-kilometer footpath by rubbing the sick tanhula with her stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.