बसमध्ये बसून गेलेले मायलेक बेपत्ता

By मनोज शेलार | Updated: April 23, 2023 19:38 IST2023-04-23T19:36:48+5:302023-04-23T19:38:28+5:30

कविता संजय पाडवी (३२) व तुषार संजय पाडवी (८ वर्ष) असे बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. 

mother and son missing after sitting in the bus | बसमध्ये बसून गेलेले मायलेक बेपत्ता

बसमध्ये बसून गेलेले मायलेक बेपत्ता

नंदुरबार : शहादा तालुक्यातील कळंबू येथील महिला व तिचा आठ वर्षीय मुलगा एस. टी. बसमध्ये बसून गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना सारंगखेडा येथे घडली. याबाबत पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. कविता संजय पाडवी (३२) व तुषार संजय पाडवी (८ वर्ष) असे बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. 

सारंगखेडा बसस्थानकात सकाळी साडेआठ वाजता आलेल्या अक्कलकुवा-कल्याण बसमध्ये बसून दोघे मायलेक बेपत्ता झाले. त्यांचा ठिकठिकाणी शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. याबाबत महिलेचे पती संजय काशीनाथ पाडवी यांनी खबर दिल्याने हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

तपास पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र दीपा भील हे करीत आहेत.
 

Web Title: mother and son missing after sitting in the bus