दीड महिन्यात जिल्ह्यात 78 लाख झाडांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:43 IST2019-08-20T12:43:02+5:302019-08-20T12:43:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागातून नंदुरबार जिल्ह्याने तृतीय स्थान पटकावत 78 ...

दीड महिन्यात जिल्ह्यात 78 लाख झाडांची लागवड
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागातून नंदुरबार जिल्ह्याने तृतीय स्थान पटकावत 78 लाख झाडांची लागवड पूर्ण केली आह़े 1 जुलै ते 19 ऑगस्ट दरम्यान वनविभागाने पुरवलेली रोपे 36 विभागांच्या माध्यमातून जिल्ह्यात लागवड केली आहेत़
जिल्ह्यासाठी यंदा शासनाने 94 लाख 98 हजार झाडांच्या लागवडीचे उद्दीष्टय़ दिले होत़े यासाठी 94 लाख 75 हजार खड्डे खोदण्यात आले होत़े 1 जुलै पासून जिल्ह्यातील विविध भागात वनविभागाकडून तयार करण्यात आलेल्या रोपांची लागवड करणे सुरु आह़े गेल्या दीड महिन्यात तब्बल 1 लाख 15 हजार 8 शासकीय अधिकारी, कर्मचारी, निमशासकीय संस्थांचे अधिकारी कर्मचारी, बँकांचे अधिकारी कर्मचारी, एसटीचे कर्मचारी, शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात ही वृक्ष लागवड मोहिम सुरु आह़े सप्टेंबर अखेरीर्पयत ही मोहिम सुरु राहणार आह़े यात वेळेआधीच 85 टक्के लागवड पूर्ण झाल्याने यंदा 100 टक्के उद्दीष्टय़ पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आह़े
गत दीड महिन्यात उद्योग विभागाने 800, सार्वजनिक आरोग्य विभागाने 4 हजार 616, सामाजिक न्याय विभागाने 450, गृह विभाग (कारागृह) 1 हजार, शालेय शिक्षण विभाग 34 हजार 75, क्रीडा विभागा 95, पशुसंवर्धन विभाग 4 हजार 250, अर्थ विभागाने 2 हजार 700, कोषागार विभागाने 1 हजार, वनविभाग 45 लाख 30 हजार 4, आदिवासी विकास विभाग 48 हजार 610, सामाजिक वनीकरण विभाग 19 लाख 46 हजार 280, ऊर्जा विभाग 1 हजार 647, पोलीस दलाकडून 3 हजार 450, राज्य उत्पादन शुल्क विभाग 360, शहरी विकास विभाग 3 हजार 700, कृषी विभाग 1 लाख 74 हजार 648, ग्रामपंचायत विभाग 10 लाख 2 हजार 20, एसटी महामंडळ 300, मस्त्य उत्पादन विभाग 1 हजार 450, तांत्रिक शिक्षण विभाग 750, सार्वजनिक बांधकाम विभाग 30 हजार 880, ग्रामविकास विभाग 3 हजार 426, जलसंधारण विभाग 710, महसूल विभाग 600, सहकार व पणन विभाग 1 हजार 852 आणि महिला बालविकास विभागाने 1 हजार 692 झाडांचे रोपण जिल्हाभरात केले आह़े
वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी आणि ग्रामपंचायतींनी वृक्ष लागवड चळवळीत यंदा मोठे योगदान दिले आह़े तीन विभागांसह जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीनी 100 टक्क्यांपेक्षा अधिक योगदान दिले आह़े राज्यात आतार्पयत सर्वाधिक वृक्ष लागवडीत अकोला जिल्ह्याने 94 टक्के काम पूर्ण केले आह़े त्यापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर नाशिक, दहाव्या क्रमांकावर धुळे तर 12 क्रमांकावर नंदुरबार जिल्ह्याने स्थान पटकावले आह़े बुलढाणा आणि ठाणे जिल्ह्याच्या तुलनेत जिल्ह्याला मिळालेले उद्दीष्टय़ हे अधिक असल्याने येत्या काळात वृक्षलागवडीच्या बाबतीत नंदुरबार राज्यातील पहिल्या दहामध्ये दिसेल अशी चिन्हे आहेत़ जिल्ह्यात आतार्पयत 85़32 टक्के वृक्षांची लागवड पूर्ण झाल्याची माहिती वनविभागाने दिली आह़े
जिल्ह्यात 6 हजार 698 नोंदणीकृत ठिकाणांवर वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती आह़े पूरामुळे यातील बरेच खड्डे आणी त्यात लावलेली झाडे पाण्यात गेली होती़ गत आठवडय़ापासून वनविभागाचे पथक या झाडांचा शोध घेत त्याठिकाणी नवीन झाडांचे रोपण करत आह़े परंतू पुरामुळे 1 टक्क्यापेक्षा कमी रोपांना फटका बसल्याची माहिती देण्यात आली आह़े जवळजवळ सर्व ठिकाणी रोपे सुरक्षित आहेत़