शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही पाण्यासाठी चढ-उताराच्या पायवाटेने ग्रामस्थांची भटकंती सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने अककलकुवा तालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने अककलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सल्लीबार ग्रामपंचायत अंतर्गत येणा:या पाडय़ांवरील हातपंप कोरडेच आहेत. परिणामी ग्रामस्थांना भटकंती करीत डोंगरद:यातून चढ-उताराच्या रस्त्यावरून नदी-नाल्याच्या ङिा:यातून पाणी आणावे लागत आहे.अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सल्लीबार ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बोरीवलपाडा येथे सहा हातपंप असूुन त्यातील चार हातपंप आटले तर दोन हातपंप जेमतेम चालत असून अर्धा किलोमीटर अंतरावरून नदीत तयार केलेल्या ङिा:यातून तेथील ग्रामस्थांना पाणी आणावे लागत आहे. फाखालपाडा येथील पाचही हातपंप अडीच महिन्यापासून आटल्याने अर्धा किलोमीटर अंतरावरून नदीत खड्डा तयार करून पाणी गाळून पिण्यासाठी आणावे लागते. पाटीलपाडा येथील आठपैकी चार हातपंप आटल्याने ग्रामस्थ नदीतील ङिा:यातून पाणी आणतात. मौलीखेडीपाडा येथील चारपैकी तीन हातपंपांची पाणी पातळी खोल गेली असून एकच हातपंप जेमतेम सुरू आहे. येथील ग्रामस्थांना पाण्याच्या शोधासाठी भटकंती करावी लागत आहे. माथाआंबापाडा, आमलीपाडा, डोसपाडा या पाडय़ांवरील हातपंपही आटल्याने तेथील ग्रामस्थांना अर्धा ते एक किलोमीटर अंतराचा चढ-उताराचा रस्ता पार करून नदी-नाल्यातील ङिा:यांमधून पाणी आणून वापरावे लागत आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ब:याच गाव व पाडय़ांर्पयत जाण्यासाठी अद्यापही रस्ते नाहीत. त्यामुळे पाणीपुरवठय़ासाठी या पाडय़ांमध्ये पाणी योजना राबविण्यासाठी अडचणी निर्माण होतात. या पाडय़ांमध्ये दरवर्षी पाणीटंचाई भासते. यंदा तर पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला. मात्र पुरेसा पाऊस न झाल्याने नदी-नाले कोरडे असून काही पाडय़ांवर असलेले हातपंपही आटले आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेंतर्गत या पाडय़ांवर विहिरी खोदल्या तर पाणीटंचाईचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो. या पाडय़ांवरील ग्रामस्थांचे दरवर्षी पाण्यासाठी होणारे हाल थांबविण्यासाठी  प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.