अश्लील मेसेज पाठवत २० वर्षीय युवतीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 11:11 IST2019-03-25T11:10:32+5:302019-03-25T11:11:14+5:30

गुन्हा दाखल : शहाद्यातील घटना

 Molestation of 20-year-old girl sending obscene messages | अश्लील मेसेज पाठवत २० वर्षीय युवतीचा विनयभंग

अश्लील मेसेज पाठवत २० वर्षीय युवतीचा विनयभंग

नंदुरबार : सोशल मिडियातून अश्लील मेसेज पाठवत शहादा येथील २० वर्षीय युवती व तिच्या कुटूंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देत युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शहादा येथील २० वर्षीय युवतीला नोव्हेंबर २०१८ पासून विविध नावांच्या फेसबुक खात्यांवरुन तसेच विविध मोबाईल क्रमांकांवरुन व्हॉटसअपद्वारे अश्लील मेसेजेस येत होते़ बदनामीच्या भितीने युवतीने हा प्रकार घरी सांगितला नाही़ संबधिताचे अकाउंट ब्लॉक करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला़ परंतू दुसऱ्या खात्यावरुन पुन्हा तोच प्रकार सुरु होत होता़ दरम्यान गेल्या काही दिवसांपासून संबधित संशयिताने तिच्या कुटूंबियांबद्दल अश्लील मेसेज करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ ही माहिती तिने घरी दिल्यानंतर कुटूंबियांनी पोलीसात धाव घेतली़ पिडित युवतीच्या फिर्यादीवरुन अज्ञात मोबाईलधारकाविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  Molestation of 20-year-old girl sending obscene messages