वावदजवळ कार अपघातात आमदार शिरीष चौधरी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 19:02 IST2018-09-17T19:02:31+5:302018-09-17T19:02:39+5:30

MLA Shirish Chaudhary injured in a car crash near Vavad | वावदजवळ कार अपघातात आमदार शिरीष चौधरी जखमी

वावदजवळ कार अपघातात आमदार शिरीष चौधरी जखमी

नंदुरबार : अमळनेरहून नंदुरबारकडे येत असताना आमदार शिरीष चौधरी यांच्या वाहनाला वावद, ता.नंदुरबार गावाजवळ अपघात झाल्याने आमदार चौधरींसह तीन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
याबाबत वृत्त असे की, आमदार शिरीष चौधरी हे आपल्या कारने अमळनेरहून नंदुरबारकडे येत होते. दोंडाईचा-नंदुरबार रस्त्यावर वावद गावाजवळील वळणावर ट्रकला ओव्हरटेक करीत असताना अचानक समोरुन वाहन आले. त्यामुळे आमदार चौधरी यांच्या कार चालकाचा ताबा वाहनावरून सुटल्याने त्यांची कार रस्त्यालगत असलेल्या खड्डय़ात आदळली. या अपघातात चौधरी यांच्या हाताला फ्रॅर झाले आहे. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या दोन जणांपैकी एकाच्या डोक्याला मार बसला असून वाहन चालकही जखमी झाला आहे. अपघातानंतर आमदार चौधरी यांनी नंदुरबार येथील डॉ.त्र्यंबक पटेल यांच्या रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. त्यानंतर तुलसी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणा:या डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: MLA Shirish Chaudhary injured in a car crash near Vavad