महिलेचा घरात घुसून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 18:20 IST2017-08-04T18:16:22+5:302017-08-04T18:20:40+5:30

आराळे येथील चौघांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिसात गुन्हा दाखल

Misty to the woman's house | महिलेचा घरात घुसून विनयभंग

महिलेचा घरात घुसून विनयभंग

ठळक मुद्देरामराजे कुटुंबात पूर्ववैमनस्य.समाज मंदिराच्या रस्त्याने झाला वादपीडित महिलेला केली घरात घुसून मारहाण

ऑनलाईन लोकमत नंदुरबार,दि.4 - किरकोळ कारणावरून चौघांनी घरात घुसून महिलेस मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना आराळे, ता.नंदुरबार येथे गुरुवारी सकाळी घडली. चौघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आराळे येथील रामराजे कुटूंबात पूर्ववैमनस्य आहे. त्यातून त्यांच्यात धूसफूस सुरू होती. प्रकाश रामराजे यांची प}ी समाज मंदीराच्या रस्त्याने म्हशीचे दूध काढण्यासाठी गेली असता त्याचा राग येवून शानुबाई सिताराम रामराजे, सिताराम उखा रामराजे, रमेश सिताराम रामराजे व किशोर सिताराम रामराजे (सर्व रा.आराळे) यांनी प्रकाश रामराजे यांच्या घरात प्रवेश करून महिलेस मारहाण केली. त्यांच्या अंगावरील वस्त्र फाडून विनयभंग केला. त्यात महिलेला गंभीर मार लागला आहे. पीडित महिलेने फिर्याद दिल्याने चौघांविरुद्ध घरात जबरीने घुसणे, मारहाण करणे आणि विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Misty to the woman's house