किरकोळ वादातून नंदुरबारात तुंबळ मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 11:55 IST2017-10-30T11:55:17+5:302017-10-30T11:55:17+5:30

चारजण जखमी : परस्पर विरोधी गुन्हे दाखल

 Minor wounds in Nandurbar in retail case | किरकोळ वादातून नंदुरबारात तुंबळ मारहाण

किरकोळ वादातून नंदुरबारात तुंबळ मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : किरकोळ कारणातून शहरातील मन्यार मोहल्ला भागात दोन गटात झालेल्या मारहाणीत चारजण जखमी झाले. मारहाणीत दोन्ही गटातर्फे तलवार, लोखंडी पट्टी, कु:हाड यांचा वापर करण्यात आला. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरातील मन्यार मोहल्ला भागात राहणारे नवाजशहा मजिदशहा फकिर व अनिस शहा ईस्माईल शहा यांच्यात लहान मुलांच्या किरकोळ वादातून भांडण झाली. भांडणाचे पर्यावसान मारहाणीत झाले. दोन्ही गटांनी तलवार लोखंडी पट्टी, लाकडी काठय़ा व कु:हाडीचा वापर केला. जखमींमध्ये रहिमशहा सलिमशहा फकिर, नवाजशहा मजिदशहा फकिर, मोहसीन शहा व अणखी एकजण असे चार जण जखमी झाले. 
याबाबत नवाजशहा मजिदशहा फकिर यांनी फिर्याद दिल्याने अनिस शहा ईस्माईल शहा, सरफराज शहा ईस्माईल शहा, ईस्माईल शहा दगू शहा, सलीम शहा गनी शहा, रहिमशहा सलीम शहा, फैजलशहा शकील शहा,  जोहराबी ईस्माईल शहा, नाहीद बानो सलीम शहा, फरजानाबी सलीम शहा, शकील शहा दगू शहा, सोहेलशहा शकील शहा, फारूख शहा निजामशहा, अनिसाबी फारूख शहा सर्व रा. नंदुरबार व सुरत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी फिर्याद रहिमशहा सलिमशहा फकिर यांनी दिली. त्यावरून नवाजशहा मजिद शहा, मोहसीनशहा मजिदशहा, महमंद रफिकशहा सफदरशहा, सूरय्याबी मजीद शहा, शहिनबी नवाज शहा,  अकीलाबी युसूफ शहा, खुर्शीदबी सफदरशहा, नवस्स्सुबानो महम्मद रफिक शहा, शिरनबी युसूफ शहा सर्व रा.मन्यार मोहल्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Minor wounds in Nandurbar in retail case