भाजपतर्फे शेतकरी बिलाला दुग्धाभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:07 IST2020-12-16T13:07:44+5:302020-12-16T13:07:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतकरी बिलाला विरोध करणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध म्हणून केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विधेयकाचा ...

भाजपतर्फे शेतकरी बिलाला दुग्धाभिषेक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतकरी बिलाला विरोध करणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध म्हणून केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विधेयकाचा जिल्हा भाजपतर्फे दुधाने अभिषेक करुन स्वागत करण्यात आले. शहरातील नेहरु चाैकात मंगळवारी सकाळी हा कार्यक्रम झाला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, राष्ट्रीय प्रवक्त्या तथा खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष संगिता सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष सपना अग्रवाल, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, राजेंद्र शर्मा, ऐजाज शेख, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बुधाभाई पाटील, डॉ.किशोर पाटील, शरद जाधव, भरत पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान, ट्रान्सपोर्ट सेल जिल्हाध्यक्ष जितेंद्र राजपुत, अश्विन सोनार, जयेश चौधरी, विजय नाईक, योगिता बडगुजर, गोरख नाईक, मुकेश अहिरे, योगेश चौधरी, निर्मल शर्मा, राजेंद्र सोनार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
जागतिक किसान दिनाचे औचित्य साधून नंदूरबार जिल्हा किसान मोर्चातर्फे केंद्रसरकारने पारित केलेल्या तीन बिलांचे दुधाने अभिषेक करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय चाैधरी, खासदार डाॅ. हीना गावीत यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मागर्दर्शन केले.