वीज कार्यालयातूनच मिटरची झाली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 11:59 IST2020-09-24T11:59:08+5:302020-09-24T11:59:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महावितरण कंपनीच्या कार्यालयातूनच चोरट्यांनी वीज मिटर लांबविल्याची घटना घडली. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल ...

The meter was stolen from the electricity office | वीज कार्यालयातूनच मिटरची झाली चोरी

वीज कार्यालयातूनच मिटरची झाली चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महावितरण कंपनीच्या कार्यालयातूनच चोरट्यांनी वीज मिटर लांबविल्याची घटना घडली. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज कार्यालयातूनच मिटरची चोरी झाल्याची ही पहिलीच घटना आहे.
वीज चोरीच्या घटना उघडकीस आणून गुन्हा दाखल करणारे महावितरणला त्यांच्याच कार्यालयातून वीज मिटर चोरीच्या घटनेला सामोरे जावे लागले. शहरातील महावितरणच्या ग्रामिण विभागाच्या कार्यालयात ही घटना १ जून रोजी घडली होती. तब्बल साडेतीन महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या ग्रामिण विभागाचे सहायक अभियंता राजीव गणेश रंजन यांनी महावितरणच्या चाचणी विभागाकडून वीज मिटर ताब्यात घेतले होते.
१ जून रोजी सकाळी हे मिटर कुणीतरी चोरून नेले. रंजन यांनी ठिकठिकाणी शोध घेऊनही मिटर सापडले नसल्याने अखेर साडेतीन महिन्यानंतर त्यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पवार करीत आहे.

Web Title: The meter was stolen from the electricity office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.