चार लाखांसाठी विवाहितेचा छळ, पाच जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 12:18 IST2019-08-25T12:18:27+5:302019-08-25T12:18:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेती घेण्यासाठी माहेरून चार लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी शिंदखेडा व पिंपळनेर ...

Marriage harassment for four lakhs, crime against five | चार लाखांसाठी विवाहितेचा छळ, पाच जणांवर गुन्हा

चार लाखांसाठी विवाहितेचा छळ, पाच जणांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेती घेण्यासाठी माहेरून चार लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी शिंदखेडा व पिंपळनेर येथील पाच जणांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
खोंडामळी येथील विवाहिता लावण्या सौरभ बागुल यांचा विवाह शिंदखेडा येथील सौरभ देविदास बागुल यांच्याशी झाला होता. विवाह झाल्यापासून सासरी मंडळी त्यांचा छळ करीत होते. शेती घेण्यासाठी माहेरून चार लाख रुपये आणावे यासाठी सातत्याने शिविगाळ करणे, हाताबुक्यांनी मारहाण करणे व जिवे ठार मारण्याची धमकी दिली जात होती. या छळाला कंटाळून लावण्या बागुल यांनी तालुका पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून सौरभ देविदास बागुल, देविदास दगडू बागुल, शोभाबाई देविदास बागुल, सुशिलकुमार देविदास बागुल सर्व राहणार शिंदखेडा, वैशाली देविदास बागुल, रा.पिंपळनेर, ता.साक्री यांच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
तपास पोलीस नाईक गुलाब तेली करीत आहे. 
 

Web Title: Marriage harassment for four lakhs, crime against five