विवाहितेचा छळ चार जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 12:29 IST2020-10-12T12:29:03+5:302020-10-12T12:29:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शिरुडदिगर, ता.शहादा येथील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला ...

विवाहितेचा छळ चार जणांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शिरुडदिगर, ता.शहादा येथील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, योगिता आखाडे या विवाहितेचा सासरची मंडळी छळ करीत होती. माहेरून दुचाकी व टीव्ही आणण्यासाठी ८० हजार रुपये आणावे अशी मागणी होती. त्यासाठी शाररिक व मानसीक छळ केला जात होता. त्याला कंटाळून विवाहितीने फिर्याद दिली. समाधान राजू आखाडे, राजू दगा आखाडे, लक्ष्मा राजू आखाडे व गोपाळू राजू आखाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार सादीक सैय्यद करीत आहे.