चिंचेच्या हंगामामुळे सातपुड्यात मिळतोय अनेकांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 11:59 IST2019-02-16T11:59:33+5:302019-02-16T11:59:39+5:30
उत्पन्नाचे साधन : दर्जेदार चिंचेला ग्राहकांकडून वाढती मागणी, हंगामाला आला बहर

चिंचेच्या हंगामामुळे सातपुड्यात मिळतोय अनेकांना रोजगार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या चिंचेच्या झाडांमुळे अनेक स्थानिकांना रोजगार मिळत आहे. चिंच तोडणी व विक्रीतून ग्रामस्थांच्या हातांना काम मिळत आहे़ चिंचेच्या बºयापैकी उपलब्धता असल्याने यावर प्रक्रियाकरुन यातून उद्योगाला चालना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़
सातपुड्याच्या कुशीतील अनेक पाड्यांच्या परीसरात शेकडो दर्जेदार चिंचेची झाडे आहेत. या झाडांना यंदा चांगलाच बहर आला आहे़ दर्जा चांगला असल्याने साहजिकच शहरी भागात येथील चिंचांना मागणी जास्त आहे़ हा व्यवसाय स्थानिकांसाठी आर्थिक उत्पन्न देणारे साधन ठरत आहेत. औषधी गुण असणाºया गोड-आंबट चिंचेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शहरी भागातील ही मागणी लक्षात घेवून अनेक व्यापारी सातपुड्यातील ग्रामस्थांकडून चिंचेची खरेदी करतांना दिसून येत आहे.
या ठिकाणी असलेली चिंचेची झाले ही संबंधित कुटुंबियांच्या मालकीची असतात. दरवर्षी साधारणत: फेब्रुवारीच्या दुसºया किंवा तिसºया आठवड्यापासून चिंचेचा हंगाम सुरू होतो. आता चिंचेचा हंगाम सुरू झाला असून दरवर्षीप्रमाणे यंदाचा हंगाम हा अनेक कुटुंबांसाठी रोजगार घेऊन आला आहे. झाडावरील चिंच काढणे, तिचे टरफल व चिंचोक्या वेगळे करणे इत्यादी विविध कामे चिंचेच्या झाडाची मालकी असणारी कुटुंबिय दिसून येत आहे.
कुटुंबातील अबालवृद्ध व स्त्रियादेखील या कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे. टरफले वेगळी केलेल्या चिंचा हे नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा, खापर, धडगाव अश्या शहराच्या ठिकाणी घेऊन जात त्याची व्यापाºयांना विक्री केली जाते. या चिंचांना व्यापाºयांकडून साधारणत: ४० ते ५० रुपये प्रतीकिलो असा अत्यल्प दर दिला जातो. चिंचेचे उत्पादन घेणाºया नागरिकांना जर योग्य बाजारपेठ मिळाली तर त्यांच्या चिंचेला वाढीव भाव मिळू शकतो. शहरातील अनेक जण जर चिंचेच्या झाडाची मालकी असणाºया व्यक्तीला पाच ते दहा किलो चिंचाची आॅर्डर देऊन चिंचा घरपोच मिळवून घेतात.
चिंचेमध्ये कॅल्शियम, पोटॅशिअम व अनेक जीवनसत्त्वे असतात़ शिवाय रक्तदाब व संधिवात नियंत्रणात ठेवण्यासाठी चिंच गुणकारी मानली जाते. जेवण रुचकर व स्वादिष्ट बनविण्यासाठी चिंचेचा स्वयंपाकात नियमित वापर केला जातो. त्यामुळे गृहिणींकडून चिंचेला अधिक मागणी मिळताना दिसून येत आहे़