शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वंचितांचे दु:ख निवारणाच्या मंत्राने आयुष्य बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:00 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला योग्य मार्गदर्शक व गुरू भेटत गेले. त्यातूनच ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला योग्य मार्गदर्शक व गुरू भेटत गेले. त्यातूनच आयुष्याची बागही बहरत गेली. म्हणूनच आज आपण शेकडो भावी वकीलांच्या आयुष्यात सुगंध देऊ शकलो आणि असंख्य वंचितांना न्याय-हक्क मिळवून देऊ शकलो. या सर्व ज्ञानाचा पाया खऱ्या अर्थाने रचला तो आपले वडील स्व.बटेसिंग रघुवंशी यांनी. त्यांनी बालपणीच ‘गरीब, शोषितांच्या दु:खाकडे बघ, धनिकांचे सुख बघू नको’ हा सल्ला दिला आणि त्यातूनच खºया अर्थाने आयुष्य बदलले. ही प्रतिक्रिया आहे ज्येष्ठ विधीतज्ज्ञ व भारताचे माजी सॉलिसीटर आॅफ जनरल अ‍ॅड.राजेंद्र रघुवंशी यांची.अ‍ॅड.राजेंद्र रघुवंशी यांचे नाव आज महाराष्टÑातील नामांकीत विधीतज्ज्ञात घेतले जाते. महाराष्टÑ-गोवा बार असोसिएशनचे नेतृत्वही त्यांनी केले आहे. आपल्या गुरुविषयी भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे गुरू भेटत गेले. आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर नंदुरबारात एल.टी. हायस्कूल व श्रॉफ हायस्कूलमध्ये शिक्षण झाले. पुढे महाविद्यालयात अ‍ॅड.पी.एन. देशपांडे आणि डॉ.पीतांबर सरोदेसारखे गुरू भेटले. पण खरे आयुष्य कळले ते पुण्याच्या होस्टेल जीवनात. होस्टेलमध्ये मिळालेल्या मित्रांनी खूप काही शिकवले. मुंबईत नंतर विधी क्षेत्रातील गुरू अ‍ॅड.के.जे. अभ्यंकर, बापूसाहेब जहागिरदार, शेखर जहागिरदार यांनी वकीली क्षेत्रातील मार्गदर्शन केले आणि पुढे आपले आयुष्यच बदलले.महाराष्टÑातील तीन अ‍ॅडव्होकेट जनरल अरविंद बोबडे, बी.आर. मनोहर व चंद्रकांत सावंत यांनी सरकारी वकील शिकवली.बापूसाहेब जहागिरदार यांनी इंग्रजी पेपर वाचनाची शिकवण दिल्याने इंग्रजीत प्रभुत्व मिळाले.पीतांबर सरोदे यांच्यामुळे हिंदीचे वक्तृत्व मिळाले.शालेय जीवनात यशवंत स्वर्गे यांच्यासारखे गुरू मिळाले.भारताचे सॉलिसीटर झाल्यानंतर राष्टÑीय विधीतज्ज्ञ राम जेठमलाणी, मीलन बॅनर्जी यांच्यासारख्यांचे मार्गदर्शन मिळाले.