आंबा बागा बहरल्या; राजापुरी वेधतोय लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST2021-02-05T08:07:36+5:302021-02-05T08:07:36+5:30

दरम्यान, सातपुड्याच्या पायथ्या लगतच्या या परिसरात आंब्यांची झाडे मोठ्या प्रमाणावर असून, शेती या मुख्य व्यवसायाबरोबरच आंबा पिकांचेही मोठ्या प्रमाणावर ...

Mango orchards flourished; Rajapuri is watching | आंबा बागा बहरल्या; राजापुरी वेधतोय लक्ष

आंबा बागा बहरल्या; राजापुरी वेधतोय लक्ष

दरम्यान, सातपुड्याच्या पायथ्या लगतच्या या परिसरात आंब्यांची झाडे मोठ्या प्रमाणावर असून, शेती या मुख्य व्यवसायाबरोबरच आंबा पिकांचेही मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेण्यात येत असते. यंदाचा हंगाम चांगला जाणार असल्याचे आंबा उत्पादक शेतकरींकडून सांगण्यात येत असून, वातावरण असेच राहिले तर आंब्यासाठी लाभदायक ठरणार असल्याचे चित्र सांगण्यात येत आहे. परिसरात राजापुरी आंबा सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, केसर आंब्याच्या बागाही बहरू लागल्या आहेत.

कृषी विभागाकडून मार्गदर्शन हवे

परिसरातील आंबा उत्पादक शेतकरींकडून आपापल्या बागांमध्ये वेळोवेळी फवारणी करण्यात येत असली तरी शेतबांध तसेच घराजवळील आंबे यांची फवारणीबाबत आंबा उत्पादक शेतकरी अनभिज्ञ असून, तालुका कृषी विभागाकडून पाहणी करण्यात येऊन फवारणीबाबत मार्गदर्शन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Mango orchards flourished; Rajapuri is watching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.