मुख्य संशयीत फरारच महिला व साथीदारांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 11:48 IST2019-08-26T11:48:09+5:302019-08-26T11:48:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कॉम्पलेक्सचा रस्ता करण्यासाठी बसस्थानकाची भिंत तोडण्यासाठी 20 लाखाची सुपारी देण्याचे प्रकरण वेगळे वळण घेण्याची ...

Major suspects abducted women and accomplices in custody | मुख्य संशयीत फरारच महिला व साथीदारांना कोठडी

मुख्य संशयीत फरारच महिला व साथीदारांना कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कॉम्पलेक्सचा रस्ता करण्यासाठी बसस्थानकाची भिंत तोडण्यासाठी 20 लाखाची सुपारी देण्याचे प्रकरण वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे. संबधीत संशयीत महिलेवर मुंबई व इतर कुठे गुन्हे दाखल आहेत किंवा कसे याचा कसून शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, मुख्य संशयीत फरारच आहे. 
साई प्लाझा कॉम्पलेक्ससाठी बसस्थानकाची भिंत तोडण्याचा प्रकार शनिवारी सकाळी झाला. 20 लाखांच्या सुपारीच्या बदल्यात मुंबई, धुळे व नाशिक येथील संशयीतांनी हे काम केले. पोलिसांच्या झडतीत त्यांच्याकडे दोन रिव्हॉल्वर आणि 25 जिवंत काडतूस आढळून आले होते. महिलेने आपण माजी खासदार असल्याचीही बतावणी केली होती. याप्रकरणी एकुण दहा जणांवर गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक करण्यात आली. पैकी सुपारी देणारा रमेश चौधरी फरार झाला आहे. 
पोलिसांनी संशयीत महिलेची कसून चौकशी सुरू केली आहे. संबधीत महिलेवर मुंबई किंवा इतर ठिकाणी गुन्हे आहेत काय?, नंदुरबारात ही महिला कुणाकुणाला भेटली. नंदुरबारशी कनेक्शन काय? आदी तपास पोलीस करीत आहेत. शिवाय फरार संशयीत रमेश चौधरी यांचाही पोलीस शोध घेत आहेत.
 

Web Title: Major suspects abducted women and accomplices in custody