शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

रेशनमध्ये आता मका व ज्वारीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यतील अंत्योदय व प्राधान्य कुटूंबांना तब्बल १३ हजार २२७९ क्विंटल ज्वारी व १५ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यतील अंत्योदय व प्राधान्य कुटूंबांना तब्बल १३ हजार २२७९ क्विंटल ज्वारी व १५ हजार ३५० क्विंटल मका  तर काही ठिकाणी ५१.५० क्विंटल बाजरी देखील वाटप केली जाणार आहे. मार्च महिन्यात हे नियोजन असून अवघ्या एक रुपये किलो प्रमाणे त्याचे वाटप केले   जाणार आहे. जिल्ह्यातील जवळपास दोन लाख ७६ हजार कुटूंबांना याचा लाभ होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागातर्फे देण्यात आली. गेल्या वर्षी व यंदा मोठ्या प्रमाणावर ज्वारी, मका  खरेदी करण्यात आला होता. तो शासकीय गोदामांमध्ये पडून आहे. त्यामुळे अंत्योदय व प्राधान्य कुटूंबांना त्याचा लाभ मिळावा यासाठी रेशनकार्ड धारकांना त्याचे वितरण गहू व तांदूळ प्रमाणे होणार आहे. मार्च महिन्यात त्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी नंदुरबार जिल्ह्यात ज्वारी तब्बल १३ हजार २७९ क्विंटल तर मका १५ हजार ३५० क्विंटल उपलब्ध आहे. याशिवाय काही ठिकाणी बाजरी देखील अर्थात ५१.५० क्विंटलपर्यंत उपलब्ध आहे.  तालुकानिहाय भरड  धान्य पुढील प्रमाणे खरेदी करण्यात आले होते. नंदुरबार तालुक्यात ज्वारी १० हजार ७६५ तर मका सहा हजार २६० क्विंटल, नवापूर तालुक्यात ज्वारी ६४.५० क्विंटल तर मका एक हजार ९३७ क्विंटल, तळोदा तालुक्यात     २३६ क्विंटल ज्वारी तर २२.५० क्विंटल मका, अक्कलकुवा तालुक्यात ८७ क्विंटल ज्वारी तर ६० क्विंटल  मका, धडगाव तालुक्यात ५६ क्विंटल ज्वारी तर ६६५ क्विंटल मका व    शहादा तालुक्यात दोन हजार ७० क्विंटल ज्वारी तर सहा हजार ४०५ क्विंटल मका खरेदी करण्यात आला होता. याशिवाय शहादा तालुक्यात ५१.५० क्विंटल  बाजरी देखील खरेदी करण्यात आली होती. मार्च महिन्यात गव्हाऐवजी  ज्वारी, मका व बाजरी दिली जाणार आहे. अंत्यद्योय व प्राधान्य कुटूंबांना ज्या प्रमाणे दर महिन्याला गहू व   तांदूळ वाटप केेले जाते त्याचप्रमाणे  हे भरड धान्य द्यावे लागणार  आहे. सर्वच रेशन धान्य दुकानांना हे भरड धान्य पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लाभार्थींनी आपल्या रेशन दुकानातून ते खरेदी करावे असे आवाहन देखील जिल्हा पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. लॅाकडाऊन आणि कोरोनाच्या काळात प्राधान्य व अंत्योदय     कुटूंबांना मोठ्या प्रमाणावर रेशनचा धान्याचा लाभ मिळाला होता. एप्रिल    ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत त्याचे  वितरण केले जात होते. त्यामुळे अनेकांचे संसार सुरळीत सुरू  राहिले. आता तांदूळ व गहू ऐवजी ज्वारी व मका दिला जाणार असल्याने अशा कुटूंबांची आणखी सोय होणार  आहे.

केवळ एक रुपया...अवघ्या एक रुपये किलो दराने ज्वारी व मका लाभार्थी कुटूंबांना दिला जाणार आहे. अंत्योदय योजनेतील कुटूंबाला १५ किलो मका व ज्वारी तर प्राधान्य कुटूंबाला दोन किलो मका व ज्वारी प्रत्येकी दिली जाणार आहे. बाजारात सद्या या दोन्ही भरड धान्याचे भाव यापेक्षा पाच ते सहा पटीने आहे.

रेशन दुकानात प्राधान्य व अंत्योदय कुटूंबांना भरड धान्याअंतर्गत ज्वारी व मका वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काही ठिकाण बाजरीही दिली जाणार आहे. मार्च महिन्याच्या नियतनात त्याचा समावेश राहणार आहे. लाभार्थी कुटूंबांनी त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे. -महेश शेलार,जिल्हा पुरवठा अधिकारी, नंदुरबार.