वेडाच्या भरात कु:हाडीने वार करून केला भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 17:40 IST2017-08-17T17:40:20+5:302017-08-17T17:40:20+5:30

बेबडदपाडाची घटना : धडगाव पोलिसात गुन्हा

Madam's blood: A bone bleeding with a bone | वेडाच्या भरात कु:हाडीने वार करून केला भावाचा खून

वेडाच्या भरात कु:हाडीने वार करून केला भावाचा खून

ऑनलाईन लोकमत
दिनांक 17 ऑगस्ट
नंदुरबार : वेडाच्या भरात मोठय़ा भावाने लहान भावावर कु:हाडीने वार करून जागीच ठार केल्याची घटना धडगाव तालुक्यातील मांडवी बुद्रूकचा बेबडदपाडा येथे 16 रोजी रात्री घडली. याप्रकरणी धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवण्या मोग्या तडवी (24) असे मयताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, बेबडदपाडा येथील चुंडय़ा मोग्या तडवी यांची मानसिक स्थिती खराब आहे. त्या भरातच त्यांनी आपला भाऊ शिवण्या मोग्या तडवी (24) याच्यावर कु:हाडीने वार केला. शिवण्या हा झोपलेला होता. ती संधी साधून त्याने त्याच्या मानेवर कु:हाडीने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 
वडिल मोग्या डुकल्या तडवी यांना ही बाब समजल्यावर त्यांनी आरडाओरड करून शेजारच्या लोकांना बोलविले. त्यानंतर धडगाव पोलिसात फिर्याद दिल्याने चुंडय़ा मोग्या तडवी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुंडय़ा यास ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: Madam's blood: A bone bleeding with a bone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.