शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने लाखो रूपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा/बोरद : शहादा आणि तळोदा तालुक्यात शुक्रवारी जोरदार वादळासह पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अवघ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा/बोरद : शहादा आणि तळोदा तालुक्यात शुक्रवारी जोरदार वादळासह पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अवघ्या अर्ध्या तासाच्या या पावसाने शेती पिकांचे व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून, अनेक ठिकाणी विद्युत पोल व वीज तारा तुटल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.शहादा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने साऱ्यांचीच धावपळ उडाली. अनेक ठिकाणी जोरदार वाºयामुळे वृक्ष उन्मळून पडल्याने वीज वितरण कंपनीच्या ताराही तुटल्या. पावसाला सायंकाळी पाच वाजेपासून सुरू झाली. सुमारे तासभर तो सुरू होता. तालुक्यात अनेक ठिकाणी केळी व पपईच्या शेतीचे नुकसान झाले असून शहादा शहरातील अनेक वसाहती जलमय झाल्या आहेत.शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वाºयासह मुसळधार पाऊस शहरात झाला. या वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने युनियन बँक परिसरातील भागात पाणी साचले व हे पाणी गोपाल शर्मा, रवींद्र राजपूत यांच्या घरात तसेच प्रभू मेडिकल व अनुसया व्यापारी संकुलातील तळ मजल्यात पाणी शिरले. शहादा नगरपालिका प्रशासनाने मुख्य रस्त्याला जोडणाºया जोड रस्त्यांची निर्मिती तत्काळ करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे़बोरद परिसरात मोठे नुकसानतळोदा तालुक्यातील मोड व बोरद परिसरात वादळी पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास हा पाऊस सुरू झाला. तब्बल अर्धा तास पाऊस व वादळाचे तांडव सुरू होते. त्यामुळे केळी आणि पपईच्या बागा मोठ्या प्रमाणावर उद््ध्वस्त झाल्या आहेत. मोड गावातील अनेक घरांवरील पत्रे उडाले. काही घरांच्या भिंती पडल्या. विजेच्या ताराही तुटल्या. वीजेचे खांबही कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. रस्त्यांवरील झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक शेतकºयांच्या केळी बागा उध्वस्त झाल्या आहेत. त्यात मोड येथील दिलीप दामू चौधरी, रमण विठ्ठल पाटील, सुभाष हरि पाटील, प्रेमसिंग हिंम्मतसिंग राजपूत, प्रविणसिंग भटेसिंग राजपूत, अजित प्रविणसिंग राजपूत, उखा नारायण चौधरी, रमाकांत सुदाम चौधरी, भगवान देविदास चौधरी, अंबालाल नवले, सुभाष मराठे, नारायण शिंदे, दिलीप पुंडलिक नवले, दरबार राजपूत, अशोक प्रल्हाद पाटील, बबन गोविंद राजपूत, जयसिंग माळी, प्रकाश शिंदे, पुरूषोत्तम रामदास चौधरी, राणाजी भिलावे, संजय वळवी, रणुबाई माळी, रामा सोनवणे, सुपाबाई ठाकरे, गणेश पाडवी या शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. डोंगरगांव ता़ शहादा येथे गुरू भुºया भिल यांच्या घराची भिंत घरातील १७ वर्षाच्या मुलीच्या अंगावर पडल्याने त्यात ती जखमी झाली आहे. सोनवलतर्फे बोरद येथे चक्री वादळाही पेक्षा भयानक वादळ शुक्रवारी संध्याकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास पाऊस व वादळी वाºयाला सुरूवात झाली. यात घर कोसळल्याने सनलाल गुलू भिल (४५), आमशी सनलाल भिल (४०), संजय सनलाल भिल (१८), आनंदी दिनेश भिल हे जखमी झाले आहेत. वादळी वाºयामुळे पत्र्यांचा व झाडे तुटली़ विद्युत पोल व रोहित्र पडल्याने भयानक परिस्थिती पहायला मिळाली. कच्ची घरे, पत्र्यांच्या घरांचे नुकसान झाले. पेरणी झालेलं पीक व उस पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र यात कुठल्याही प्रकारे जीवितहानी झाली नाही.काथर्दे पुनर्वसन वसाहतीत अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी दिली़ वेगवान वारे आणि पाऊस यामुळे शहादा आणि तळोदा तालुक्यातील गावांमध्ये रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडीत होता़ तळोदा तालुक्यातील रेवानगर व मोड पुनवर्सन वसाहतीत बाधितांच्या घरांचे पत्रे उडाल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले होते़ तळोदा शहरातील बसस्थानक परिसरात वाºयामुळे मोठे नुकसान झाले असून टपºया उडून गेल्याचे सांगण्यात आले आहे़ वीज पुरवठा खंडीत झाल्याने नुकसानीचा अंदाज आलेला नाही़ शनिवारी सकाळी जिल्ह्यातील विविध भागात प्रशासन पंचनामे करुन आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे़