नंदुरबार शहरात भर दिवसा व्यापाऱ्याची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 11:28 IST2019-02-13T11:27:57+5:302019-02-13T11:28:04+5:30

दोघे अज्ञात : पोलीस असल्याची बतावणी

Loot of merchants throughout the city in the city of Nandurbar | नंदुरबार शहरात भर दिवसा व्यापाऱ्याची लूट

नंदुरबार शहरात भर दिवसा व्यापाऱ्याची लूट

नंदुरबार : पोलीस असल्याची बतावणी करुन मंदिरात दर्शनासाठी जाणाºया व्यापाºयाला दोघांनी गंडवल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला़ शहरातील हाट दरवाजा भागात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे़
महावीर कॉलनी परिसरात राहणारे मदनलाल हरकचंद जैन हे सकाळी ८़३० वाजेच्या सुमारास दुकानाकडे जात असताना हाट दरवाजा परिसरातील शनिमंदिरात दर्शनासाठी वळले़ यावेळी याठिकाणी दोन अज्ञात व्यक्तींनी पोलीस असल्याचे सांगून जैन यांना थांबवले़ तपासणीच्या बहाण्याने त्यांच्याजवळ असलेली पिशवी आणि हातातील दागिने काढण्यास सांगितले़ जैन यांनीही हातातील १७ ग्रॅम वजनाच्या चार अंगठ्या काढून दिल्या़ यानंतर दोघांनी हातचालाखी करत दागिने पिशवीत टाकल्याचे भासवत मंदिराजवळून पळ काढला़ हा प्रकार लक्षात आल्यानंतर मदनलाल जैन यांनी आरडाओरड केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़
याबाबत मदनलाल जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र चव्हाण करत आहेत़

Web Title: Loot of merchants throughout the city in the city of Nandurbar