शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
2
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
6
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
7
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
8
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
9
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

लॉकडाऊनमध्येही अवैध दारूचा पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 12:15 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदी व लॉकडाऊच्या काळात देखील जिल्ह्यात अवैध दारूचा पूर सुरूच असल्याचे दिसून येत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संचारबंदी व लॉकडाऊच्या काळात देखील जिल्ह्यात अवैध दारूचा पूर सुरूच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसात राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांनी शहादा, नवापूर, नंदुरबार तालुक्यातून ५ लाखापेक्षा अधीकचा दारूसाठा जप्त केला आहे. शहरी भागात तर काही दारू विक्रेते घरपोच सेवा बजावत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे मात्र शासनाचा दारू दुकाने, बिअरबार, बिअरशॉपी बंद ठेवण्याच्या उद्देशाला हारताळ फासला जात आहे.राज्य शासनाने २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर त्याच दिवसापासून सर्व दारू दुकाने, बिअरबार, बिअरशॉपी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तळीरामांची चांगलीच गैरसोय झाली आहे. अशा तळीरामांची सोय करण्यासाठी अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणावर दारू विक्री होत असल्याचे चित्र आहे. नवापूर, नंदुरबार, शहादा तालुक्यात झालेल्या कारवाईत ही बाब उघड झाली आहे. आता पोलिसांनी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशा दारू विक्रेत्यांवर वक्रदृष्टी करावी अशी मागणी होऊ लागली आहे.साठा रेकॉर्ड तपासणारलायसन्स असलेले सर्व देशी व विदेशी दारू विक्रीची दुकाने, बिअरबार व बिअरशॉपी यांचाकडे असलेला साठा यापूर्वी अर्थात दारू दुकाने बंद करण्याच्या आदेशावेळी मोजण्यात आला आहे. जेंव्हा ही दारू दुकाने व बिअरबार सुरू होतील त्यावेळी हा साठा राज्य उत्पादन शुल्क विभाग पुन्हा तपासणी करणार आहे. त्यात तफावत आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई थेट लायसन्स रद्द होणे किंवा आर्थिक दंड या स्वरूपात राहणार आहे.अवैध दारू विक्री प्रकरणी नंदुरबार येथील हॉटेल छोटीवर पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने या हॉटेलमधील बंद करतांनाचा दारूसाठा व कारवाई झाली त्यादिवसाचा दारू साठा याची पडताळणी केली असता तफावत आढळल्याने या हॉटेलचे लायसन्स रद्द करण्याची शिफारस करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.घरपोच सेवाही उपलब्धशहरी भागात काही दारू विक्रेते घरपोच सेवा उपलब्ध करून देत आहेत. संबधितांकडे मागणी केल्यावर एक ते दिड तासात संबधीत व्यक्ती घरपोच सेवा उपलब्ध करून देतात. ही दारू संबधितांना कुठून उपलब्ध होते हा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात बोगस दारू बनविण्याचे कारखाने असल्याचे वेळोवेळच्या कारवाईने उघड झाले आहे. शिवाय मध्यप्रदेश सिमेलगत देखील असे कारखाने आहेत. त्यामुळे मध्यप्रदेश बनावटीची बोगस दारूचा सध्या नंदुरबारात सुळसुळाट असल्याचे दिसून येत आहे. नंदुरबारात घरपोच दारू पोहचिविणाऱ्या महाभागांचाही पोलिसांनी शोध घ्यावा व त्यांनाही जेरबंद करावे, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

दुचाकीस्वारकडेही अवैध दारूनंदुरबार : दुचाकीवर अवैध दारू घेवून जाणाऱ्या एकास तालुका पोलिसांनी अटक केली.हरिश्चंद्र पितांबर पाटील, रा.रजाळे, ता.नंदुरबार असे संशयीताचे नाव आहे. शनीमांडळ फाट्यावजळ पाटील हे दुचाकीने जात होते. त्यावेळी त्यांना तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने अडविले असता त्यांच्याकडे सहा हजार रुपये किंमतीच्या देशी, विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या. त्याला लागलीच अटक करण्यात आली.याबाबत हवालदार गणेश सोलंकी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवापुरात एक लाख सहा हजारांची दारू जप्तलोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूर तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत एलसीबीने एक लाख सहा हजार रुपयांची अवैध दारू व एक वाहन असा एकुण तीन लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.एलसीबीला मिळालेल्या माहितीवरून ४ एप्रिल रोजी नवापूर येथील जुना आरटीओ नाका येथे पथकाने रात्री सापळा लावला होता. पहाटे साडेपाच वाजता नवापूरकडून महामार्गावरून गुजरात राज्यात पांढऱ्या रंगाची टोयोटो कार (क्रमांक जीजे ०६-सीएम ६०३) येतांना दिसली. यावेळी पथकाने वाहन थांबविण्याचा इशारा करूनही ते भरधाव निघाले. त्यानंतर त्याचा पाठलाग करून अडविले असता चालक साहुल बालू गावीत, रा.नवापूर याने उडवाउडवीची उत्तरे दिली. वाहनाची तपासणी केली असता त्यात ८२ हजार ३६३ रुपये किंमतीची देशी दारू मिळून आली. ही दारू नवापूर येथून गुजरातमधील खेड्यापाड्यात विक्रीसाठी पाठविण्यात येत असल्याचे चालक गावीत याने सांगितले. पथकाने साहुल गावीत याला ताब्यात घेतले. तसेच वाहन व दारूसाठा असा एकुण दोन लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दुसरी घटना नवापूर शहरातील हॉटेल जितेंद्रनजीक घडली. हॉटेलच्या आडोशाला विनोद भगवानदास गोकलाणी, रा.नवापूर हा देशी-विदेशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. एलसीबीच्या पथकाने त्या ठिकाण धाड टाकली असता त्याच्याकडे २४ हजार २५४ रुपये किंमतीचा दारूसाठा आढळला. त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही प्रकरणी नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, हवालदार महेंद्र नगराळे, मुकेश तावडे, दादाभाऊ वाघ, सुनील पाडवी, शांतीलाल पाटील, युवराज चव्हाण, राकेश वसावे, जितेंद्र तोरवणे यांनी केली.