‘चक्कर’चा बहाणा करुन ‘बुलेट’ लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 11:58 IST2020-01-03T11:58:51+5:302020-01-03T11:58:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चक्कर मारण्याचा बहाणा करुन एकाने दीड लाखाची बुलेट मोटारसायकल चोरी करुन नेल्याची घटना चिरखान, ...

‘चक्कर’चा बहाणा करुन ‘बुलेट’ लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चक्कर मारण्याचा बहाणा करुन एकाने दीड लाखाची बुलेट मोटारसायकल चोरी करुन नेल्याची घटना चिरखान, ता़शहादा येथे घडली़ १४ डिसेंबर रोजी घडलेल्या प्रकारानंतर गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे़
चिरखान येथील संग्राम बाबुलाल ठाकरे यांनी काही दिवंसांपूर्वी १ लाख ५० हजार रुपयांची दुचाकी खरेदी केली होती़ १४ डिसेंबर रोजी त्यांच्याकडे अशोक महादेव गिते रा़ ठेतेगव्हाण ता़ धारुर जि़ बिड हा आला होता़ मेहुण्याची ओळख दिल्याने संग्राम ठाकरे यांनी त्यास विश्वासाने दुचाकी चालवायला दिली होती़ यानंतर अशोक हा दुचाकी घेऊन थेट पसार झाला़ त्याचा शोध घेऊनही तो मिळून आला नाही़ याबाबत संग्राम ठाकरे यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अशोक गिते याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस कॉन्स्टेबल तारसिंग वळवी करत आहेत़