अंगणात बसलेल्या बालकावर बिबट्याचा हल्ला; बालकाचा मृत्यू
By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: April 5, 2023 10:28 IST2023-04-05T10:28:24+5:302023-04-05T10:28:53+5:30
वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

अंगणात बसलेल्या बालकावर बिबट्याचा हल्ला; बालकाचा मृत्यू
नंदुरबार: देवमोगरा पुनर्वसन, ता.अक्कलकुवा शिवारातील शेतात असलेल्या घराच्या अंगणात बसलेल्या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री उशीरा घडली.
सुरेश पाडवी (वय ७वर्ष) असे बालकाचे नाव आहे. बालक रात्री अंगणात खाटेवर बसला होता तर, त्याचवेळी पिकातून आलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून फरफटत नेले. त्याच्या मांडीचे लचके बिबट्याने तोडले. जिवाच्या अकांताने बालकाचा ओरडण्याचा आवाज आल्याने आई, वडील धावले, त्यानंतर काही अंतरावर बिबट्या बालकाला सोडून पिकांमध्ये पळाला. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.