12 वर्षापासून फरार आरोपीस एलसीबेने केले गुजरातमध्ये जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 13:00 IST2019-08-17T13:00:29+5:302019-08-17T13:00:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तीन लाखाची कार चोरणा:या व गेल्या 12 वर्षापासून फरार असलेल्या संशयीतास स्थानिक गुन्हा अन्वेशन ...

12 वर्षापासून फरार आरोपीस एलसीबेने केले गुजरातमध्ये जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तीन लाखाची कार चोरणा:या व गेल्या 12 वर्षापासून फरार असलेल्या संशयीतास स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने बेडय़ा ठोकल्या.
फरार असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने मोहिम आखली आहे. त्याअंतर्गत सुरेंद्रनगर, गुजरात येथून नंदुरबारातील चोरीच्या घटनेतील संशयीताला अटक केली. नरेंद्र रमेशभाई पाटील, रा.कामगारनगर, सुरेंद्रनगर असे संशयीताचे नाव आहे. 25 जून 2008 रोजी शहरातील रेल्वेगेट जवळील हॉटेलजवळून हरीष मंगा चौधरी यांची तीन लाखांची कार चोरीस गेली होती. शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. चोरीस गेलेली कार संशयीतांनी गीता मंदीर चौक, अहमदाबाद येथे सोडून दिली होती. त्यातील संशयीत नरेंद्र रमेशभाई पाटील हा 12 वर्षापासून फरार होता. संशयीत सुरेंद्रनगर येथे नाव व ओळख बदलून ट्रक चालक म्हणून काम करीत होता. स्थानिक गुन्हा अन्वेशन पथकाला संशयीतांची कोणतीही ओळख नसतांना जेरबंद करण्याचे ठरविले. त्यानुसार गुजरातमधील सुरेंद्रनगर येथील ट्रक ट्रमिनस येथे दोन दिवस कर्मचा:यांनी पाळत ठेवून तेथून त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे किशोर नवले, हवालदार प्रदीप राजपूत, किरण पावरा, विजय ढिवरे, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली.