१३ मुख्याध्यापक गैरहजर आढळल्याने नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 11:58 IST2020-01-02T11:58:30+5:302020-01-02T11:58:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तळोदा आदिवासी विकास प्रकल्पाधिकाऱ्यांच्या भेटीप्रसंगी शासकीय आश्रम शाळांमध्ये गैरहजर आढळून आलेल्या १३ मुख्याध्यापक व ...

ल्याने Notice due to absence of Headmaster | १३ मुख्याध्यापक गैरहजर आढळल्याने नोटीसा

१३ मुख्याध्यापक गैरहजर आढळल्याने नोटीसा

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तळोदा आदिवासी विकास प्रकल्पाधिकाऱ्यांच्या भेटीप्रसंगी शासकीय आश्रम शाळांमध्ये गैरहजर आढळून आलेल्या १३ मुख्याध्यापक व दोन अधिक्षकांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीसा बजाविण्यात आल्या असून, १० विसाच्या आत खुलासा मागविण्यात आला आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रकल्प प्रशासनाने मुख्याध्यापकांवर कारवाईचा बडगा उगारल्याने आश्रमीय कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
तळोदा आदिवासी विकास प्रकल्पामार्फत चालविण्यात येत असलेल्या तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय आश्रमशाळांमधील भौतीक सुविधा व शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे ठोस प्रयत्न नूतन प्रकल्प प्रशासनाने घेतला आहे. याच पार्श्वभूमिवर आश्रम शाळांना अचानक भेटी देवून तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी प्रकल्पाधिकारी अविशांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रकल्प अधिकाºयांसह कर्मचाºयांचे चार पथके तयार करण्यात आले होते.
दरम्यान, प्रकल्प अधिकारी अविशांत पांडा व पथकांनी २७ डिसेंबररोजी रात्रीच प्रकल्पातील २० शासकीय आश्रमशाळांना अचानक भेट देऊन सर्जिकल स्ट्राईक केले होते. त्यापैकी मोजरा, चुलवड, सलसाडी, जांगठी, मांडवी, कंकाळामाळ, नाला, लोभाणी, बोरद, काकर्दा, वलवाड-शिर्वे, सरी अशा १३ आश्रमशाळांमधील मुख्याध्यापकांबरोबरच बोरद व वलवाड येथील अधीक्षकदेखील गैरहजर आढळून आले होते. त्या वेळी पथकांनी शाळांची पाहणीदेखील केली होती.
मुख्याध्यापक व अधीक्षक असे १५ कर्मचारी गैरहजर आढळून आल्याप्रकरणी प्रकल्प प्रशासनाने मंगळवारी कारणे दाखवा नोटीसा बजविल्या आहेत. संबंधीत कर्मचाºयांनी १० दिवसाच्या आत योग्य खुलासा करण्याचे नमूद करून अन्यथा कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रकल्प प्रशासनाने प्रथम भरारी पथके नेमून आश्रमीय कर्मचाºयांवर सर्जिकल स्ट्राईक सारखी कारवाई केल्याने कर्मचाºयांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. तथापि प्रशासनाने यात कायम सातत्य ठेवण्याची पालकांची अपेक्षा आहे.

Web Title: ल्याने Notice due to absence of Headmaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.