नवापुरात कपडय़ांचे दुकान फोडून मुद्देमाल लांबवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 12:39 IST2019-12-02T12:39:28+5:302019-12-02T12:39:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर शहरातील सिंधी मार्केटमध्ये कपडय़ांचे दुकान फोडून कपडय़ांसह रोख रक्कम चोरटय़ांनी चोरुन नेली़ शनिवारी ...

Launched clothes shop in Navapur | नवापुरात कपडय़ांचे दुकान फोडून मुद्देमाल लांबवला

नवापुरात कपडय़ांचे दुकान फोडून मुद्देमाल लांबवला

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर शहरातील सिंधी मार्केटमध्ये कपडय़ांचे दुकान फोडून कपडय़ांसह रोख रक्कम चोरटय़ांनी चोरुन नेली़ शनिवारी उघडकीस आलेल्या या घटनेत चोरटय़ांनी तब्बल 2 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आह़े 
शहरातील सिंधी मार्केटमधील अमर ड्रेसेस या कपडय़ांच्या दुकानाच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी आत प्रवेश करत 1 लाख 60 हजार रुपयांचे शर्ट पॅन्ट व 45 हजार रुपये रोख असा एकूण 2 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला़ नवापुर शहरात गेल्या आठवडय़ात चोरटय़ांनी कपडय़ांचे दुकान फोडल्याची घटना घडली होती़ त्यानंतर पुन्हा दुस:या ठिकाणी चोरीची घटना घडल्याने व्यापा:यांमध्ये भिती निर्माण झाली आह़े 
याबाबत अमर जयकिशन आहुजा यांनी नवापुर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंपी करत आहेत़ चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत व सहायक पोलीस निरीक्षक शिंपी हे करत आहेत़ 
 

Web Title: Launched clothes shop in Navapur