भरदिवसा एक लाखाचा ऐवज लंपास

By Admin | Updated: January 8, 2017 23:44 IST2017-01-08T23:44:38+5:302017-01-08T23:44:38+5:30

शहादा : चोरटय़ांमध्ये तरुणी असल्याचा संशय

Lakhs of a lakh | भरदिवसा एक लाखाचा ऐवज लंपास

भरदिवसा एक लाखाचा ऐवज लंपास

शहादा : शहरातील डोंगरगाव रस्त्यावर  स्वामी नारायण मंदिरालगत दादावाडी नगरातील एका बंद घरातून चोरटय़ांनी सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली़
शुक्रवारी  घरमालक नीलेश जैन    यांच्या पत्नी दवाखान्यात उपचारासाठी गेल्या होत्या़ परत आल्यानंतर त्यांना घराचा मागचा दरवाजा उघडा दिसला़ त्यांनी आरडओरड केल्याने दोन जणांनी रोख रक्कम व दागिने घेऊन पळ काढला. ही बाब लक्षात आल्यानंतर नागरिकांनी चोरटय़ांचा पाठलाग केला मात्र चोरटे रिक्षात बसून पळ काढण्यात यशस्वी झाल़े याबाबत शहादा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आह़े जैन यांच्या घराजवळील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये या दोन चोरटय़ांपैकी एक युवती असल्याचे दिसून आले        आह़े (वार्ताहर)

Web Title: Lakhs of a lakh