निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर दारूसह पावणेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 12:30 IST2019-10-13T12:30:07+5:302019-10-13T12:30:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने लक्कडकोट, ता.नवापूर येथे टाकलेल्या धाडीत अवैध ...

Lakh issues including liquor confiscated on the backdrop of the election | निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर दारूसह पावणेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त

निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर दारूसह पावणेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने लक्कडकोट, ता.नवापूर येथे टाकलेल्या धाडीत अवैध दारूसह पाच लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक पसार झाला. 
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर अवैध दारू विक्री आणि वाहतुकीवर लक्ष ठेवले जात आहे. त्याच अनुषंगाने उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला माहिती मिळाल्यावरून लक्कडकोट येथे पाळत ठेवली असता भरधाव वाहन (क्रमांक एमएच 12- केएन 9851) जातांना दिसले. वाहनाचा पाठलाग करून अडविले असता त्यात परराज्यातील निर्मित विदेशी दारू मिळून आली. पथकाने दारूसह एकुण पाच लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईवेळी वाहनचालक तेथून पसार झाला.
ही कारवाई निरिक्षक मनोज संबोधी, अनुपकुमार देशमाने, सुभाष बाविस्कर, प्रशांत पाटील, योगेश पाटील, योगेश सूर्यवंशी, हेमंत पाटील, अजय रायते, हर्षल नांद्रे व पथकाने केली.     
 

Web Title: Lakh issues including liquor confiscated on the backdrop of the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.