शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अडचणीत आलेल्या आदिवासी कुटूबांना खावटी मंजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या आदिवासी कुटूंबांना आदिवासी विकास विभागाने मदतीचा हात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या आदिवासी कुटूंबांना आदिवासी विकास विभागाने मदतीचा हात दिला आहे. खावटी कर्जाअंतर्गत १५ लाख कुटूंबांना तीन हजार रुपयांप्रमाणे लाभ मिळणार आहे. त्यात ५० टक्के रक्कम ही जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात तर ५० टक्के रक्कम ही रोख स्वरूपात दिली जाणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी दिली.लॉकडाऊनमुळे मजुरी करणाऱ्या कुटुंबांना आर्थिक समस्यांना सामारे जावे लागत असल्याने त्यांना सहाय्य करण्यासाठी राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनी अशा गरजू आदिवासी कुटुंबासाठी खावटी अनुदान योजना जाहीर केली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे उपस्थित होते.कोविड-१९ संकटामुळे अनेक आदिवासी मजुरांचे रोजगार गेले असून, त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना असणार आहे. लवकरच योजनेच्या अंतिम स्वरूपास मान्यता देण्यात येणार आहे.सर्व आदिवासी मनरेगा मजूर कुटुंब, आदिम जमातीची सर्व कुटुंबे, पारधी समाजाची सर्व कुटुंबे, प्रकल्प अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी यांनी निश्चित केलेली गरजू आदिवासी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.यंदाचे वर्ष महाराष्ट्र राज्य स्थापनेचे हिरक महोत्सवी वर्ष असल्याने कामगार दिनी गरजू आदिवासी मजूर वर्गाच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहण्यासाठी ही योजना जाहीर करत असल्याचे पाडवी यांनी सांगितले. योजनेचा सविस्तर तपशील लवकरच शासन निर्णयाच्या स्वरूपात जाहीर करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

या योजनेचा साधारण १५ लाख कुटुंबांना लाभ होणार आहे. प्रत्येक कुटुंबाला तीन हजार रूपयाप्रमाणे लाभ देण्यात येईल. यातील ५० टक्के रक्कम इंडिया पोस्ट पेमेंट बँक किंवा मनिआॅर्डरद्वारे देण्यात येईल आणि ५० टक्के रक्कमेच्या जीवनावश्यक वस्तू देण्यात येतील. योजनेची अंमलबजावणी तीन टप्प्यात करण्यात येईल.