खापर येथे दहा लाखांचे अवैध मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 12:46 IST2018-03-11T12:46:52+5:302018-03-11T12:46:52+5:30

At Khapar, 10 lakhs of illegal liquor was seized | खापर येथे दहा लाखांचे अवैध मद्य जप्त

खापर येथे दहा लाखांचे अवैध मद्य जप्त

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 11 : उत्पादन शुल्क विभागाने अक्कलकुवा व खापर येथून दहा लाखांचे अवैध मद्य जप्त केले. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी ही कारवाई करण्यात आली.
खापर येथे अवैध मद्याचा साठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. पथकाने दोन ठिकाणी छापा टाकला असता अवैध मद्यसाठा आढळला. मनोज मगन चौधरी यास अटक करण्यात आली. मोटरसायकलीसह एकुण 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भरारी पथकाचे मनोज संबोधी, एस.के.कानडे, बी.डी.बागले, हितेश जेठे, अविनाश पाटील, नितीन ढणके, अजय रायते, राहुल साळवे, धनराज पाटील यांनी ही कारवाई केली. 
 

Web Title: At Khapar, 10 lakhs of illegal liquor was seized