खांडबा:यात जमावाच्या मारहाणीत दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 11:53 IST2017-10-28T11:53:52+5:302017-10-28T11:53:52+5:30

तलवारीने मारहाण : 16 जणांवर गुन्हा

Khandoba: Two injured in mob assassination | खांडबा:यात जमावाच्या मारहाणीत दोन जखमी

खांडबा:यात जमावाच्या मारहाणीत दोन जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शैक्षणिक संस्थेच्या जागेसाठी ना हरकत दाखला मिळाला असतांनाही त्यावर हरकत घेवून 50 हजारांची मागणी मान्य न केल्याने एकास जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना खांडबारा, ता.नवापूर येथे 26 रोजी घडली. याप्रकरणी जमावाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खांडबारा येथील आदिल रफिक अरेबियानी यांनी निंबोणी शिवारात शैक्षणिक संस्था काढण्यासाठी ना हरकत दाखला मिळविला होता. त्यावर फारूख युसूफ मेमन यांनी हरकत घेवून 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यावरून त्यांच्यात वाद होऊन जमावाने त्यांना बेदम मारहाण केली. मारहाणीत लोखंडी रॉड व तलवारीचा उपयोग करण्यात आला. याशिवाय 15 हजार रुपये रोख व 30 हजार रुपयांची सोन्याची चेन देखील जमावाने जबरीने चोरून नेली. त्यात आदिल रफिक अरेबियानी व रियास हाजीभाई अरेबियानी हे जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत आदिल रफिक अरेबियानी यांच्या फिर्यादीवरून फारूक युसूफ मेमन, उस्मान युसूफ मेमन, यासीन युसूफ मेमन, जैतून युसूफ मेमन, यास्मीन उस्मान मेमन, सिरीन यासीम मेमन, रफिक गफार मेमन, अल्तम रफिक मेमन, फातीमा इंद्रीस मेमन, फिरोज सत्तार मेमन, बल्कीश फिरोज मेमन, हाजी लतीफ मेमन, रफीक हाजी इसानी, इलीयास हाजी इसानी, अल्ताफ गफार इसानी, हमीद अल्ताफ इसानी सर्व रा.खांडबारा यांच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गावात पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला असून लवकरच संशयीतांना अटक करण्यात येणार आहे.     

Web Title: Khandoba: Two injured in mob assassination