शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीतर्फे जोडेमारो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला़ यांतर्गत नंदुरबारसह ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले़ नंदुरबार तहसील कार्यालय परिसरात पदाधिकाऱ्यांनी जोडेमारो आंदोलन केले़यावेळी राष्ट्रवादीचे डॉ़ अभिजीत मोरे, मधुकर पाटील, महेंद्र चौधरी, पुष्पा गावीत, जगदीश जयस्वाल, भटू शंकर पटेल, माधव पटेल, आसिफ शेख, निलेश चौधरी यांच्यासह नंदुरबार तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते़ प्रारंभी राष्ट्रवादीतर्फे गोपींचद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करुन त्यांची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले़ नायब तहसीलदार गोपाळ पाटील यांनी ते स्विकारले़ निवेदनात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल टिका करणारे भाजप आमदार पडळकर यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली़ दरम्यान तहसील आवारात आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला पदाधिकाऱ्यांनी जोडे मारत घोषणाबाजी केली़शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत आमदार पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला़ तहसीलदार यांना पक्षातर्फे निवेदन देऊन चौकशीची मागणी करण्यात आली़ या आंदोलनात सुरेंद्र कुवर, शांतीलाल साळी, राजेंद्र वाघ, जगदीश माळी, शुभम कुवर, रविद ठाकरे, समद शेख यांच्यासह शहादा तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते़जिल्ह्यातील इतर तालुक्यातही आंदोलन करण्यात येवून आमदार पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला़ ठिकठिकाणी निवेदन देण्यात आले़राष्ट्रवादी युवकतर्फे नंदुरबारात पुतळ्याचे दहननंदुरबार : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पुतळ्याचे दहन करुन जिल्हाबंदीची घोषणा करण्यात आली़ पडळकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाºयांकडून निषेध व्यक्त करण्यात आला़राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुपारी ४ वाजता नवापूर-साक्री रस्त्यालगतच्या मैदानात हे आंदोलन केले़ भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा मार देऊन दहन करण्यात केले. तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष सागर जयस्वाल, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे,एकलव्य आदिवासी क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र अहिरे, हंसराज पाटील, निलेश अहिरे, बॉबी बैसाणे, प्रकाश गावीत, साईकुमार गावीत उपस्थित होते.शरद पवार हे देशाचे नेते आहेत. भाजपचे आमदार पडळकर यांनी त्यांच्यावर केलेले वक्तव्य हे खालच्या दर्जाचे असून त्यांची मानसिक स्थिती खराब झाल्याचे जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी यांनी यावेळी सांगितले़