ठेकेदार व पीडब्ल्यूडीने आणले जेरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:49 AM2019-08-18T11:49:27+5:302019-08-18T11:49:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाघेश्वरी चौफुली ते भोणे फाटय़ार्पयतचा रस्ता काँक्रीटीकरण केला जात असून ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम ...

Jarris brought in by the contractor and PWD | ठेकेदार व पीडब्ल्यूडीने आणले जेरीस

ठेकेदार व पीडब्ल्यूडीने आणले जेरीस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वाघेश्वरी चौफुली ते भोणे फाटय़ार्पयतचा रस्ता काँक्रीटीकरण केला जात असून ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागानेही मनमानी चालविल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. कमरेएव्हढे खड्डे आणि गुढघ्याभर चिखलातून वाहनचालकांना वाट काढावी लागत आहे. खड्डे भरणे आवश्यक असतांना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 
या भागातील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे काँक्रीटीकरण केला जात आहे. एका बाजुचे काँक्रीटीकरण काम सुरू असल्यामुळे दुस:या भागाचा रस्ता रहदारीसाठी मोकळा आहे. परंतु याच रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अक्षरश: जिवघेणी कसरत वाहनचालकांना करावी लागत आहे. पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. चिखलाचाही थर साचला आहे. गुढघ्याभर चिखलातून वाहनचालक वाट काढत नाही तोच पुन्हा कमरेएवढय़ा खड्डय़ातून वाहन काढावे लागते. यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत. खड्डे बुजविणे आणि गाळ जेसेबीने काढणे आवश्यक असतांना ठेकेदाराने अक्षरश: मनमानी कारभार चालविला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखील या ठेकेदारावर कुठलेही नियंत्रण नाही. ठेकेदार व पीडब्ल्यूडी विभाग यांनी संगनमत करूनच नागरिकांच्या व वाहनचालकांच्या जिवाशी खेळ सुरू ठेवला आहे. 
या रस्त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून भोणे फाटा, विश्वकर्मा मंदीर आणि तेथून व्ही.जी. पेट्रलपंप र्पयत पर्यायी रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली. परंतु वाहतूक वळविण्याआधी भोणे फाटा ते विश्वकर्मा मंदीर र्पयतच्या रस्त्याची डागडुजी आणि आजूबाजू भराव करणे आवश्यक असतांना तसे न करता थेट वाहतूक वळवून दिली. त्यामुळे या रस्त्यावरून दोन वाहने जाणेही जिकरीचे ठरते. 
पर्यायी रस्ता तातडीने सुधारणा केली नाही आणि काम सुरू असलेल्या अध्र्या रस्त्याचे खड्डे भरले नाही आणि गाळ काढला नाही तर या भागातील नागरिक, व्यावसायिक तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

मुळात पावसाळ्यात काम सुरू करणेच चुकीचे होते. पावसाळ्यात रस्त्याचे काम करण्याचा हा अजब कारभार सध्या शहरवासी अनुभवत आहेत. 
नवापूर-विसरवाडी महामार्ग बंद असल्यामुळे या मार्गावरील जड वाहनांची वाहतूक नंदुरबारमार्गे वळविली आहे. वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे या रस्त्यावर जिवघेणे कसरत करावी लागत आहे. वाहतूक पोलिसांनी नियंत्रण ठेवणे आश्यक आहे. 
 

Web Title: Jarris brought in by the contractor and PWD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.