Jain society attracts attention in martyrdom | शहाद्यात जैन समाजातर्फे शोभायात्रेने वेधले लक्ष
शहाद्यात जैन समाजातर्फे शोभायात्रेने वेधले लक्ष


लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरात पद्मभूषण पूज्यपाद राष्ट्रीय संत जैन आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा यांची अंबाजीनगर येथील राजस्थानी मंगल कार्यालयापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
शोभायात्रेत दाऊदी बोहरा समाजाच्या बुºहानी बॅण्ड पथकाने स्वागत गीत सादर केले. पद्मभूषण रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा यांच्यासह साधुसंत व शहरातील सकल श्री संघ जैन समाजातील महिला-पुरूष हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी जय महावीर नामाचा जय जय जयकार करण्यात आला. या शोभायात्रेचे सकल जैन समाजाच्या व्यावसायिकांनी स्वागत करून महाराज यांचे पूजन केले. शोभायात्रेत युवतींनी डोक्यावर कळस घेतले होते.
पदयात्रा खेतिया रोडमार्गे महात्मा गांधी पुतळा, जुन्या तहसील कार्यालय, डोंगरगाव रोड, पटेल रेसिडेन्सीमार्गे थेट श्री सुघोषा घंट मंदीर येथे आल्यावर शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. यानंतर मंगल प्रवचन झाले असून, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. परिवर्तन प्रवचन मालेत पद्मभूषण राष्ट्रीय संत रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांनी सांगितले की, महाभारतातील धृतराष्ट्र, शकुनी व दुर्योधन यांच्या कुटिलता, इर्षा व अंधपणा या तीन गोष्टींमुळे महाभारत घडले आहे. ज्यांच्याकडे विवेक आहे तोच व्यक्ती पुढे जाऊ शकतो, वाईट सोडून चांगल्या गोष्टींचे आचरण करणे यालाच विवेक असे म्हणतात. धृतराष्टÑाकडे विवेक नसल्याने महाभारतात अनेक गोष्टी घडून आल्या. घराच घरपण टिकवण्यासाठी घरातील मुख्य व्यक्तीने कुटुंबाशी कधीही खोट बोलू नये, संसार करीत असताना पुण्य-पाप कर्म येणार, मात्र आपण चालत असताना आपल्या सद्सदविवेकबुद्धीला चांगली चालना दिल्यास वाईट कृतीपासून लांब राहणार आहोत. दुसऱ्यांचा हेवा करू नका, कोणालाही ओव्हरटेक करत असताना आपण एकटे पडू यासाठी आपली विवेक बुद्धी शाबूत ठेवून कुठलेही काम करावे. समाजातील व्यक्तींची मानसिकता ३५ ते ४० वर्षापर्यंत पैसे कमवण्याची व त्यानंतर परमेश्वराला आठवण करण्याची आहे यात बदल झाला पाहिजे असे सांगितले. यांनतर बालगोपालांनी नृत्य सादर केले. कार्यक्रमास शहर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा भाविकांनी घ्यावा, असे श्री जैन स्वेतांबर मुर्तीपूजा शहादा तसेच श्री सकल जैन संघ शहादा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Jain society attracts attention in martyrdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.