चालकानेच रचला दरोडय़ाचा कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 12:24 IST2019-08-25T12:24:26+5:302019-08-25T12:24:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गाडी अडवून डोळ्यात मिरची पावडर फेकून पाच ते सहा जणांनी मारहाण करीत एक लाख ...

चालकानेच रचला दरोडय़ाचा कट
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : गाडी अडवून डोळ्यात मिरची पावडर फेकून पाच ते सहा जणांनी मारहाण करीत एक लाख 21 हजार रुपये जबरीने हिसकावून नेल्याची माहिती वाहन चालकाने त्याच्या मालकाद्वारे पोलिसांना कळविल्याने पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र घटनास्थळाच्या परिस्थितीवरून पोलिसांना ही घटना बनावट असल्याचा संशय आल्याने चालकाला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने घटनेचे सत्य उलगडले. चालकानेच हा बनावट दरोडा घडवून आणल्याचे उघडकीस आले.
पोलीस सूत्रानुसार, टेंभा-शिरुड रस्त्यावर 22 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी वाहन चालक अजरुन संतोष पाडवी (रा.शहादा) व त्याच्या सहा साथीदारांना गजाआड केले आहे. शहादा येथील बालाजी वेफर्सचे मालक अमित मोतीलाल जैन यांच्याकडे टेम्पो (क्रमांक एम.एच.39 - 8718) या वाहनावर अजरुन संतोष पाडवी हा चालक म्हणून कार्यरत आहे. 22 ऑगस्ट रोजी अजरुन पाडवी टेंभा येथे वेफर्स पोहोचविण्यासाठी मदतनीस योगेश माळी यांच्यासह गेला होता. त्याच्याजवळ एक लाख 21 हजार रुपये रोख जमा झाले होते. ही रक्कम घेऊन तो रात्री साडेआठ वाजता तालुक्यातील टेंभा-शिरुड रस्त्याने येत असताना पाच ते सहा जणांनी त्याचे वाहन अडवित वाहनाच्या काचा फोडल्या तसेच त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्यांना मारहाण करुन पाडवी याच्याजवळ असलेली एक लाख 21 हजार रुपये जबरीने हिसकावून नेत तेथून अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले, अशी माहिती संतोष पाडवी याने मालक अमित जैन यांना दिली. जैन यांनी तात्काळ पोलिसांना घटना कळविली. पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, हवालदार जलाल शेख, मनोज सरदार, विकास कापुरे, दीपक भोई, स्वप्नील गोसावी, महेंद्र ठाकूर, देवा गावीत, दीपक फुलपगारे, नानाभाऊ ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिसरात आरोपींचा शोध घेण्याचा प्रय} केला. मात्र आरोपी मिळून आले नाही व टेम्पो रस्त्याच्या बाजूला उभा असल्याचे दिसले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता चालकाने सांगितलेली हकीकत व परिस्थितीजन्य पुरावे पाहून ही घटनाच बनावट असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी चालक पाडवी यास पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसी खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला व त्याने हा बनावट दरोडा त्याच्या सहा साथीदारांमार्फत घडवून आणल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्या सहा साथीदारांचा शोध घेत अवघ्या काही तासातच अजरून संतोष पाडवी (रा.शहादा), योगेश निंबा माळी (रा.कोंढावळ), ज्ञानेश्वर झुलाल सोनवणे, राजू संजू पवार, सुनील इंदास ब्राम्हणे, विशाल मनोज पवार, दिपक छोटू पवार (सर्व रा.सावळदा, ता.शहादा) यांना गजाआड केले. आरोपींकडून एक लाख चार हजार 489 रुपये व मोबाईल हस्तगत करण्यात आला. या बनावट दरोडय़ात चालकच घटनेचा सूत्रधार निघाल्याचे उघड झाले. अमित जैन यांच्या फिर्यादीवरुन वरील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार सादीक शेख हे करीत आहेत.